मराठी बातम्या /बातम्या /देश /

प्रसिद्धीसाठी माणुसकीही विसरले; BJP महिला आमदाराच्या 'फोटोसेशन'वर नागरिकांकडून संताप

प्रसिद्धीसाठी माणुसकीही विसरले; BJP महिला आमदाराच्या 'फोटोसेशन'वर नागरिकांकडून संताप

अख्ख्या कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, यात दोन मुली व व्यक्तीच्या आईचा मृत्यू झाला. काही वेळांपूर्वी या व्यक्तीचादेखील मृत्यू झाला आहे.

अख्ख्या कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, यात दोन मुली व व्यक्तीच्या आईचा मृत्यू झाला. काही वेळांपूर्वी या व्यक्तीचादेखील मृत्यू झाला आहे.

अख्ख्या कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, यात दोन मुली व व्यक्तीच्या आईचा मृत्यू झाला. काही वेळांपूर्वी या व्यक्तीचादेखील मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

भोपाल, 28 नोव्हेंबर : मध्य प्रदेशतीलव (Madhya Pradesh) भाजप सरकारमधील (BJP MLA) एका महिला आमदारावर टीका केली जात आहे. जीवन-मरणाची संघर्ष करणाऱ्या एका व्यक्तीला मदतीचा चेक देताना महिला आमदाराने फोटो काढले, यानंतर महिला आमदारावर देशभरातून विरोध केला जात आहे.  (Forget about humanity for publicity Citizens angry over BJP women MLAs photosession)

गोविंदपुरा विधानसभेतून भाजप आमगार महिला कृष्णा गौर (Krishna Gaur) यांच्या या फोटोवरुन वाद निर्माण झाला आहे. गौर या भोपाळमधील आनंदनगरमधील गायत्री रुग्णालयात गेल्या आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाला चेक देऊन फोटो काढला. या व्यक्तीच्या दोन मुली आणि आईचा मृत्यू झाला आहे. भोपाळमधील कर्जात बुडालेल्या एका मॅकेनिकने आपल्या दोन मुली, आई, पत्नीसह विष खाऊ आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आतापर्यंत या प्रकरणात मॅकेनिकच्या दोन्ही मुली, आई यांचा मृत्यू झाला आहे. कालांतर ज्या व्यक्तीला चेक दिला तिचाही मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

हे ही वाचा-प्रशांत किशोर यांच्या बंगळुरू भेटीची चर्चा; दक्षिणेत कुणासाठी सुरू मोर्चेबांधणी?

या प्रकरणात पोलिसांनी 4 महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोपाळमधील पिपलानीमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 5 जणांनी विष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर भोपाळमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात दोन मुली आणि वृद्ध महिलाचा मृत्यू झाला आहे. यावेळी पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोटही सापडली. यामध्ये मुलींना दोन महिलांना आरोपी मानत कारवाई सुरू केली आहे. मृत मुलींमधील एका मुलीचं वय 21 वर्षे आणि दुसरीचं वय 16 वर्षे असल्याचं सांगितलं जात आहे.

सांगितलं जात आहे की, या कुटुंबाने 3 टक्के व्याजाच्या दरावर 3.72 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. यापैकी 80 हजार त्यांनी परत केलं होतं. मात्र त्यांना कर्ज देणारे प्रत्येक आठवड्यात 10 हजार रुपयांचं व्याज देण्यासाठी दबाव आणत होते. आरोपींना या कुटुंबातील सदस्यांना खोट्या प्रकरणात अडकवणे आणि मुलींवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. यामुळे ते खूप त्रस्त होते. पोलिसांनी या प्रकरणा चार महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला असून यात दोन पाळीव कुत्रे आणि एक पांढरा उंदीर मृत पडल्याचं दिसत आहे. तर भिंतीवर आम्हाला न्याय हवा असंही लिहिलं आहे.

First published: