Forbes India 30 Under 30 च्या यादीत मराठी उद्योजक आणि यूट्यूबर

Forbes India 30 Under 30 च्या यादीत मराठी उद्योजक आणि यूट्यूबर

लहान वयात विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तींची यादी फोर्ब्स इंडियाने जाहीर केली आहे. या यादीत धावपटू हिमा दास, क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि आयुषी अग्रवाल यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय 3 मराठी तरुणांचाही या यादीत समावेश आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: लहान वयात विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तींची यादी फोर्ब्स इंडियाने जाहीर केली आहे. Forbes India 30 Under 30 या नावाने ही सहावी यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या यादीत धावपटू हिमा दास, क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि आयुषी अग्रवाल यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय 3 मराठी तरुणांचाही या यादीत समावेश आहे.

मनोरंजन, बिझनेस, क्रीडा अशा १६ विविध क्षेत्रातील व्यक्तींची ४ निकषाद्वारे निवड करण्यात आली आहे. या यादीत भारतातील 30 वर्षा खालील उद्योन्मुख प्रतिभावंतांचा समावेश केला आहे.

यादीत समावेश करण्यात आलेल्या कामगिराचा प्रभाव, त्यांनी सुरु केलेल्या उद्योगामुळे पर्यावरणाचे झालेले संरक्षण याचा विचार केल्याचे फोर्ब्स इंडियाचे संपादक ब्रायन कोर्वाल्हो यांनी सांगितले.

या यादीत 12 तरुणींचा तर 38 तरुणांचा समावेश करण्यात आला आहे.

डिझाईन क्षेत्रातल्या यादीत निनाद कुलकर्णी या 27 वर्षांच्या आर्टिस्टचा समावेश आहे. निनाद 3D आर्टिस्ट असून अॅनिमेशन फिल्ममेकर म्हणून त्याने नाव कमावलं आहे. त्याची 3D अॅनिमेटेड फिल्म KCLOC (an anagram of clock)ही जगभरातल्या 120 फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखण्यात आली आहे. न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये आपली कला दाखवायचं निमंत्रण निनादला मिळालं आहे.

प्राजक्ता कोळी ही मुंबईकर तरुणी मनोरंजन क्षेत्रातल्या यादीत आहे. ही 25 वर्षांची यूट्यूबर Mostly Sane नावाचं यूट्यूब चॅनेल चालवते.  तिच्या चॅनेलचे 3 कोटी 20 लाख सबस्क्रायबर्स आहेत.

सागर यरनाळकर या 29 वर्षांचा तरुण उद्योजक यादीत आहे, त्याचा पार्टनर अनुराग गुप्ता याच्याबरोबर. डेलीनिंजा नावाचा स्टार्टअप या दोघांनी सुरू केला. रोजचा दुधाचा रतीब ऑनलाईन सुरू करण्याचा आणि त्यासाठी दूधवाल्यांचं नेटवर्क वेबवर विणण्याचा व्यवसाय या दोघांनी सुरू केला.

First published: February 4, 2019, 8:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading