काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी दिलीप मानेंचं नाव निश्चित

काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी दिलीप मानेंचं नाव निश्चित

विधानपरिषदेची पोटनिवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसनं विधानपरिषदेसाठी माजी आमदार दिलीप माने याचं नाव राज्य पातळीवरून निश्चित केलंय.

  • Share this:

26 नोव्हेंबर : विधानपरिषदेची पोटनिवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसनं विधान परिषदेसाठी माजी आमदार दिलीप माने याचं नाव राज्य पातळीवरून निश्चित केलंय. त्याबद्दलचा अंतिम निर्णय दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटी घेणार आहे.

पंचायत समिती सभापती,आमदार,शिक्षण सम्राट,साखर कारखानदार अशी महत्वाची जबाबदारी दिलीप माने हे पार पाडत आहेत.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.दक्षिण सोलापूर तालुक्याचे ते आमदार होते. माजी आमदार कै. ब्रह्मदेव माने यांचे ते सुपुत्र आहेत.माजी मंत्री पतंगराव कदम,राष्ट्रवादीचे नेते शरद पवार,अजित पवार,माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे त्यांना नेहमीच आशीर्वाद मिळत आले आहेत.

दरम्यान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव मागे पडले असल्याचे वृत्त असून दिलीप माने यांना उमेदवारी देण्याचे जाहीर झाल्याचे समजते.माने यांनीसुद्धा या वृत्ताला दुजोरा दिला आहे.भाजपला शह देण्यासाठी सेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली असून यातून दिलीप माने यांच्या नावाचा विचार झाला असल्याचे बोलले जात आहे.

विधान परिषदेचा उमेदवार ठरवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. काँग्रेस तगडा उमेदवार देण्याची शक्यता आहे. भाजप कोणाला उमेदवारी देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीत खा. अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, नसीम खान, अॅड. गणेश पाटील उपस्थित आहेत.

कोण आहेत दिलीप माने?

-दिलीप माने हे कॉंग्रेसचे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष.

- दिलीप माने हे माजी आमदार कै. ब्रह्मदेव माने यांचे चिरंजीव.

- सिध्दनाथ साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन.

- कॉंग्रेसचे नेते आणि आमदार पतंगराव कदम यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2017 07:12 PM IST

ताज्या बातम्या