हैद्राबाद, 16 मे : स्वप्नवेडी, ध्येयवेडी अनेक लोकं आपल्या आसपास असतात. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ते सतत धडपडत असतात. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायची त्यांची तयारी देखील असते. सर्व संकटांवर मात करत अनेकांनी त्यांची स्वप्न पूर्ण केल्याचं आपण पाहिलं आहे.
अशाच एका ध्येयवड्या, स्वप्नवेड्या आंध्रप्रदेशातील तरूणानं आपलं तिरंग्याचं स्वप्न करण्यासाठी आपलं घर विकलं. विश्वास नाही ना बसत? आर. सत्यनारायण असं या तरूणाचं नाव आहे. कुठेही सिलाई नसलला तिरंगा आर. सत्यनारायणला तयार करायचा होता. 8/12 असं या तिरंग्याचं माप आहे. त्यासाठी 6.5 लाख रूपयांची गरज होती. मग हा पैसा उभा करण्यासाठी आर. सत्यानारायणनं आपला घर विकलं. लाल किल्ल्यावर हा तिरंगा फडकावला जावा असं आर. सत्यनारायण याचं स्वप्न आहे.
केंद्र सरकारला न विचारता झाली संजय दत्तची येरवडामधून सुटका
नरेंद्र मोदींच्या हवाली केला तिरंगा
आर. सत्यनारायणनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशाखापट्टणम दौऱ्यावेळी त्यांना हा तिरंगा भेट दिला. पण, या तिरंग्याची खासियत पंतप्रधानांना सांगण्याकरता मात्र त्याला वेळ मिळाला नाही. तिरंगा बनवण्यासाठी आर. सत्यनारायणला 4 वर्षाचा कालावधी लागला. त्यामुळे हा तिरंगा लाल किल्ल्यावर फडकावला जाणार का? आर. सत्यनारायणचं स्वप्न पूर्ण होणार का? हे पाहावं लागणार आहे.
VIDEO: नथुराम गोडसे देशभक्तच, साध्वी प्रज्ञा यांचं वादग्रस्त वक्तव्य