पाटणा, 15 ऑक्टोबर: असं म्हटलं जातं की प्रेम आंधळं असतं, पण प्रेमात बुडालेल्या एका तरुणाने संपूर्ण गावाला वैताग आणून सोडला आहे. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी संबंधित तरुण संपूर्ण गावातील वीजपुरवठा खंडीत करत होता. मागील बऱ्याच दिवसांपासून ठरावीक वेळेत किमान तीन तास वीजपुरवठा खंडीत होतो. यामुळे गावकरी वैतागले होते. पण अखेर संबंधित तरुणाचा कांड उघडकीस आला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी तरुणाला रंगेहाथ पकडून त्याची भयंकर अवस्था केली आहे.
गावकऱ्यांनी संबंधित तरुणाला आपल्या प्रेयसीसोबत अश्लील कृत्य करताना रंगेहाथ पकडलं आहे. यानंतर गावकऱ्यांनी त्याचं अर्ध मुंडण करत, दोघांच्याही गळ्यात चपलांचा हार घातला आहे. यानंतर शेवटी गावकऱ्यांनी आरोपी तरुणाचं त्याच्या प्रेयसीसोबत लग्न लावून दिलं आहे. विशेष म्हणजे संबंधित तरुण विवाहित असून त्याचं गावातील तरुणीसोबत गेल्या चार पाच वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. तो ज्यावेळी आपल्या प्रेयसीला भेटायला यायचा तेव्हा गावातील लाइट किमान तीन तासांसाठी बंद ठेवायचा. पण अखेर प्रियकर तरुणाचा प्रताप उघडकीस आला आहे. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी त्याची चांगलीच धुलाई केली आहे.
हेही वाचा-नाशकात गरबा कार्यक्रमात शेकडो तरुण-तरुणींचा धांगडधिगा; पोलिसांनी दाखवला इंगा
संबंधित घटना बिहारच्या पुर्णिया जिल्ह्यातील कृत्यानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. तर सुरेंद्र राय असं संबंधित प्रियकर तरुणाचं नाव असून तो वायरमन म्हणून काम करतो. तो विवाहित असून गेल्या पाच वर्षांपासून त्याचं डहेरिया आदिवासी टोला येथील एक आदिवासी तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. तो ज्या-ज्या वेळेस प्रेयसीला भेटण्यासाठी डहेरिया गावात जायचा, तेव्हा तीन तासांसाठी संपूर्ण गावातील वीजपुरवठा खंडित करायचा. सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते.
हेही वाचा-Tinderवरील मित्रानं केला विश्वासघात; पुण्यातील IT अभियंता तरुणीला 73लाखांचा गंडा
अखेर संबंधित वायरमनचा प्रताप गावातील काही तरुणांच्या लक्षात आला. यामुळे त्यांनी काही गावकऱ्यांच्या मदतीनं वायरमला रंगेहाथ पकडण्याची योजना आखली. त्यानुसार गावकऱ्यांनी आरोपी तरुणाला रंगेहाथ पकडलं आहे. गावकऱ्यांनी त्याचं अर्ध मुंडण करत त्याची बेदम धुलाई केली आहे. त्यानंतर शेवटी गावकऱ्यांनी त्याचं लग्न संबंधित प्रियकर तरुणीशी लावून दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.