काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ, दोन दहशतवाद्यांमागे एक जवान होतोय शहीद

काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ, दोन दहशतवाद्यांमागे एक जवान होतोय शहीद

जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झालीय. अतिरेक्यांचा खात्मा होत असतानाच जवानांनाही आपल्याला गमवावं लागतंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मार्च : जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झालीय.  हंदवाडामध्ये मागील 72 तासापासून सुरू असलेल्या सीआरपीएफ आणि दहशतवाद्यांमधल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईत जम्मू काश्मीरच्या 2 पोलिसांसह सीआरपीएफचे 2 जवान शहीद झाले आहेत. तर, 4 स्थानिक लोक देखील जखमी झाले आहेत.  बाबागुंडमध्ये लष्करानं पोलिसांच्या मदतीनं सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर फायरींग सुरू केली. यामध्ये 9 जवान जखमी झाले आहेत. तर, 4 जवान शहीद झाले आहेत.

परिस्थिती स्फोटक

पूलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधली परिस्थिती आणखी चिघळली आहे. गेल्या चार वर्षात राज्यातली परिस्थिती सर्वाधिक खराब असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. केंद्र सरकारने परिस्थिती पूर्वपदावर यावी यासाठी अनेक उपाययोजना केल्यात मात्र त्याचा फायदा झाला नाही. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच राज्यपालपदावर राजकीय व्यक्तिची निवड केली गेली मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही असच दिसून येतं आहे.

लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध 'ऑपरेशन ऑल आऊट' ही मोहिम राबवली आणि मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश मिळवलं असा दावा केला. मात्र या करावाईमध्ये लष्करी जावनही मोठ्या प्रमाणावर शहीद झाले ही वस्तुस्थिती आहे. दोन अतिरेक्यांचा खात्मा करताना एका जवानाला वीर मरण पत्करावं लागलं.

साउथ आशिया टेरेरिझम पोर्टल (SATP)  ही संस्था दहशतवादाचा अभ्यास करणारी संस्था आहे. या संस्थेकडे जी आकडेवारी आहे त्यानुसार जम्मू आणि काश्मीरमधली स्थिती सर्वाधिक हिंसक झाल्याचं म्हटलं आहे.

धक्कादायक आकडेवारी

2018 मध्ये छोटे आणि मोठे 205 हल्ले झाले होते. तर 2017 मध्ये हिंसाचाराच्या एकूण 164, 2016 मध्ये 112, 2015 मध्ये 88 आणि 2014 मध्ये 90 घटना घडल्या होत्या. 2019 च्या दोन महिन्यांमध्ये दहशवादी हल्ल्याच्या 16 घटना घडल्या होत्या.

News18 ने जेव्हा या सगळ्या घटना आणि आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की 2 अतिरेक्यांच्या खात्मा करताना एका जवानाला शहीद व्हावं लागलं. तर 82 अतिरेक्यांमागे 18 स्थानिक नागरिक ठार झाले. नोव्हेंबर महिन्यात सुरक्षा दलांनी 107 तर डिसेंबर महिन्यात 105 अतिरेकी ठार केले.

लष्कराचं नुकसान

2014 ते फेब्रुवारी 2019 या पाच वर्षात अतिरेक्यांच्या हल्ल्यात 381 जवानांना वीर मरण आलं. सर्वात जास्त दहशतवादी हल्ले हे 2018 मध्ये घडल्याचं स्पष्ट झालं. 2018 मध्ये दहशतवदी हल्ल्यात 91 सैनिकांना प्राण गमवावे लागले. तर 38 नागरिकांना प्राण गमवावे लागाले. या आकडेवारीवरून 2018 मध्ये सर्वात जास्त अतिरेकी ठार झाले असले तरी जवान, नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर प्राण गमवावे लागले.

2014 ते 2018 दरम्यान सामान्य नागरिकांच्या मृत्यूत 35.71 टक्के वाढ झाली. तर 2014 ते 2018 दरम्यान 134 टक्के जास्त दहशतवादी मारले गेले.

भारतीय लष्कराने 2014 मध्ये 110 अतिरेक्यांना ठार केलं. 2018 मध्ये ही संख्या वाढून 257 झाली. या पाच वर्षात 838 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं. तर 2014 ते  2018 या काळात जम्मू-कश्मीरमध्ये एकूण 1315 जणांचा मृत्यू झाला.  त्यात 138 (10.49%) नागरिक, 339 (25%) जवान आणि 838 (63.72%) अतिरेकी होते.

First published: March 3, 2019, 3:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading