Home /News /national /

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता दोन तासांहून कमी विमान प्रवासासाठी नवा नियम

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता दोन तासांहून कमी विमान प्रवासासाठी नवा नियम

नागरी उड्डाण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या एका नोटिफिकेशननुसार, देशांतर्गत उड्डाणादरम्यान दोन तासांहून कमी वेळेच्या प्रवासात, प्रवाशांना जेवण दिलं जाणार नाही. तर 2 तासांहून अधिक विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना जेवणाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 12 एप्रिल : केंद्र सरकार कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना जेवण (No Food in Flights) दिलं जाणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाकडून (Civil Aviation Ministry) जारी करण्यात आलेल्या एका नोटिफिकेशननुसार, देशांतर्गत उड्डाणादरम्यान दोन तासांहून कमी वेळेच्या प्रवासात, प्रवाशांना जेवण दिलं जाणार नाही. तर 2 तासांहून अधिक विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना जेवणाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने, मागील वर्षी कोरोना काळातही हा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोरोनाची लाट काहीशी कमी झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येदरम्यान गेल्या दोन आठवड्यांपासून विमान प्रवासासाठी प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. रविवारी संपूर्ण देशात कोरोनाचे 1.70 लाखहून अधिक नवे रुग्ण आढळले असून, हा रेकॉर्ड आकडा आहे.

  (वाचा - Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, पाहा काय आहे लेटेस्ट गोल्ड रेट)

  नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितलं की, ज्या विमानांचा कालावधी 2 तासांहून अधिक आहे, तेथेही जेवण टप्प्या-टप्प्याने दिलं जाईल. जर विमानात जेवण दिलं गेलं, तर ते प्री-पॅक्ड असेल आणि डिस्पोजेबल प्लेटसह दिलं जाईल. वापरानंतर प्लेट किंवा पॅकिंग मटेरियल सुरक्षितरित्या नियमांनुसार डिस्पोज केलं जाईल. कोणत्याही परिस्थितीत याचा पुन्हा वापर केला जाणार नाही. चहा, फॉफी आणि इतर पेयदेखील डिस्पोजेबल बॉटल, कंटेनर किंवा कॅनमध्ये दिलं जाईल. क्रू मेंबर्सला प्रत्येक मील सर्व्ह केल्यानंतर आपले ग्लव्ल्स बदलण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

  (वाचा - एक चूक आणि रिकामं होईल FD अकाउंट; ग्राहकांना अलर्ट)

  हा निर्णय कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे घेण्यात आला आहे. तसंच कोविड-19 व्हायरसच्या नव्या म्युटेंटमुळे संक्रमणाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे विमान प्रवासादरम्यान खाण्या-पिण्याच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. देशांतर्गत विमान प्रवासासाठीचे हे नवे नियम 15 एप्रिलपासून लागू केले जातील.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Coronavirus, Covid-19, Domestic flight

  पुढील बातम्या