मराठी बातम्या /बातम्या /देश /लालूच्या मुलाच्या लग्नात जेवणावरून राडा; कार्यकर्त्यांनीच केली तोडफोड

लालूच्या मुलाच्या लग्नात जेवणावरून राडा; कार्यकर्त्यांनीच केली तोडफोड

 पण झालं असं की लग्नामध्ये आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एक अफवा  पसरली. ती अशी की लग्नात व्हीआय़पींना चांगल चविष्ट जेवण दिलं जातंय आणि आपल्याला  तितकं चांगलं जेवण मिळतं नाही. बस्स! पुढच्या  10 मिनिटात सगळं चित्रच बदललं.

    13 मे: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे अध्यक्ष असलेल्या लालू प्रसाद यादवच्या मुलाच्या लग्नात काल जेवणावरून राडा झाला. एवढंच नाही तर खुर्च्या , टेबलांसकट सगळ्याच गोष्टींची तोडफोड  राजदच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

    काल लालू प्रसाद यादवच्या मुलाचं  लग्न होतं. ऐश्वर्या राय नावाच्या मुलीशी होणाऱ्या या लग्नाची  राजकीय वर्तुळात बरेच दिवस चर्चा होती. नीतीश कुमारांसह अनेक दिग्गजांनी या लग्नाला हजेरी लावली. त्यासोबत राजदचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात लग्नाला हजर झाले. पण झालं असं की लग्नामध्ये आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एक अफवा  पसरली. ती अशी की लग्नात व्हीआय़पींना चांगल चविष्ट जेवण दिलं जातंय आणि आपल्याला  तितकं चांगलं जेवण मिळतं नाही. बस्स! पुढच्या  10 मिनिटात सगळं चित्रच बदललं.

    खुर्च्या तोडल्या ,टेबल फोडले , सारं वातावरणच बदलून गेलं. हे पाहून राजदचे विविध पदाधिकारी राडा थांबवण्यास धावले. राडा करणाऱ्यांवर त्यांनी लाठी ही उगारली.  पण याचा काहीच फायदा झाला नाही .या साऱ्यामुळे लग्नाचा  रंगच उडून गेला.

    दरम्यान या लग्नासाठी  10,000 लोकांच्या जेवणाची व्यवस्था कॅटरर्सनी केली होती.  हे कमी होतं की  लग्नाहून परतत असताना लालूच्या दुसऱ्या मुलाच्या गाडीचा एक्सीडेंट झाला. यात 4 लोक दगावले

    First published:
    top videos

      Tags: Boy, Marriage