खासदारांना संसदेतल्या कँटिनमध्ये मिळणारं स्वस्त जेवण आता बंद

खासदारांना संसदेतल्या कँटिनमध्ये मिळणारं स्वस्त जेवण आता बंद

'अनेक खासदार हे घरूनच टिफीन आणतात किंंवा बाहेर जेवायला जातात त्यामुळे याचा फार काही फायदा होत नव्हता.'

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 05 डिसेंबर : खासदारांना संसदेच्या कँटिनमध्ये मिळणारे स्वस्तातील खाद्यपदार्थ आता बंद होणार आहेत. कारण, इथे मिळणाऱ्या जेवणावरील सबसिडी रद्द करण्याबाबतचा एक प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नुकताच सभागृहात मांडला. या प्रस्तावाला सर्व खासदारांनी एकमताने मान्यता दिली. या कँटिनला देण्यात येणाऱ्या सबसिडीमुळे दरवर्षी खर्च होणारे 17 कोटी रुपये वाचणार आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावर सर्वच पक्षांच्या नेत्यांची बैठक घेऊन त्यांना विश्वासात घेतलं होतं. सर्वपक्षीय नेत्यांनी मान्यता दिल्यानंतरच याबाबत संसदेत प्रस्ताव ठेवण्यात आला. गेली अनेक वर्ष खासदारांना मिळणाऱ्या या सवलतीबद्दल टीका केली जात होती. महागाई वाढत असताना खासदारांना सवलत का द्यायची असा सवाल विचारला जात होता. त्यामुळे ही सवलतच रद्द करण्यात आलीय.

गुन्हे कमीकरण्याची 100 टक्के गॅरंटी रामही देणार नाही, भाजप मंत्र्याची मुक्ताफळं

सरकारच्या या निर्णयाला शिवसेनेनेही पाठिंबा दिलाय. खासदार फार कमी वेळा कँटिनमधल्या जेवणाचा स्वाद घेतात. अनेक खासदार हे घरूनच टिफीन आणतात किंंवा बाहेर जेवायला जातात त्यामुळे याचा फार काही फायदा होत नव्हता असं मत शिवसेनेचे खासदार गजानन किर्तिकर यांनी व्यक्त केलंय.

खासदारांना विशेष सवलत म्हणून ही सोय अनेक वर्षांपासून दिली जाते. त्याची चर्चाही कायम होत असते. जेवणासोबतच खासदारांना विमान, रेल्वे आणि बसच्या प्रवासामध्येही खास सवलती दिल्या जातात. त्याचबरोबर दिल्लीत त्यांना राहायला घरही दिलं जातं. त्याचबरोबर खासगी सचिव नेमण्याची मुभाही दिली जाते.

खासदार हा लोकसेवक आहे, नोकर नाही त्यामुळे त्यांना अशा सवलती नको अशी मागणीही कायम होत होती.

 

 

Published by: Ajay Kautikwar
First published: December 5, 2019, 10:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading