झुंझुनू, 25 मे : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटात अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आत्मनिर्भर होण्याचा संदेश भारतीयांना दिला आहे. त्यानंतर प्रत्येक भारतीय आपल्या पातळीवर काहीतरी नवीन करण्याचा विचार करीत आहे.
अशात खेतडी भागातील वॉर्ड क्रमांक 10 चा निवासी प्रवीणकुमार याने हैद्राबादमधील एनआयटी वरंगलमध्ये इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिकचाअभ्यास करीत आहेत. या तरुणानेही भारतीयांना आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला आहे. प्रवीणने भागात ऑनलाईन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तो दररोज भाज्या व फळांचा रेट लोकांना पाठवतो. यावर प्रवीण म्हणतो की, घरबसल्या लोकांना सुविधा दिली जात आहे आणि 10 टक्के सवलतही देत आहे.
प्रवीण याने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला होता. त्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा विचार डोक्यात सुरू होता. लॉकडाऊनमुळे विद्यार्थी घरी आला होता. त्यामुळे पार्ट टाइम काम करण्यासाठी त्याने भाजी विक्रीचे काम सुरू केले. यानंतर लोकांची खूप चांगला प्रतिसाद दिल्याचे प्रवीण सांगतो. ऑनलाईन स्वस्त व चांगल्या दर्जाची भाजी मिळत असल्याने लोक बाजारात गर्दी करीत नव्हते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोकाही नव्हता.
अनेकांनी इंजिनिअरनंतर भाजी विक्री काय करतो? असा प्रश्न उपस्थित केला. मात्र कोणतेही काम छोटं वा मोठं नसतं. मनापासून काम केलं तर यश तुम्हाला नक्की मिळेल, असं प्रवीण सांगतो.
हे वाचा -लॉकडाऊन 4.0 : केवळ 3 प्रवाशांना घेऊन विमानानं केलं टेकऑफ
भारताने करुन दाखवलं! सर्वाधिक पीपीई किट बनवणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर