23 डिसेंबर : 1996 मध्ये उघड झालेल्या चारा घोटाळ्या प्रकरणी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलंय. लालूप्रसाद यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून जेलमध्ये जावं लागणार आहे.
बिहारचे दोन महारथी लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा यांचा राजकीय करिअर उद्धवस्त झालंय. दोन दशकांपासून या प्रकरणाची कायदेशीर लढाई सुरू आहे.
आज रांचीमध्ये सीबीआयच्या विशेष कोर्टाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवलंय. तर माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रांसह 7 जणांची निर्दोष मुक्तता केलीये. चारा घोटाळा पहिले 1986 मध्ये उघड झाला होता. पण, लालूप्रसाद यादव जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा घोटाळा समोर आलाय. याआधी लालूप्रसाद यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. आता पुन्हा एकदा लालूंना जेलमध्ये जावं लागणार आहे.
काय आहे चारा घोटाळा?
- बिहारमध्ये 1991 ते 1996 दरम्यान चारा खरेदीत मोठा भ्रष्टाचार
- बिलात हेराफेरी करून कोट्यवधींचा अपहार केल्याचा ठपका
- बिलाची रक्कम लाटण्यासाठी जनावरांची वाढीव संख्या दाखवली
- बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रा आणि बड्या अधिकाऱ्यांसह एकूण 34 जणांवर घोटाळ्याचा आरोप
- 37 कोटी 50 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी लालूप्रसाद यांना 5 वर्षांची शिक्षा आणि 25 लाखांचा दंड
- 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून लालूप्रसाद यांना जामीन मंजूर
- झारखंड उच्च न्यायालयाकडून लालूप्रसाद यादवांवर दाखल इतर 3 खटल्यांवर स्थगिती
- सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती उठवल्यानंतर लालूप्रसाद यादवांवरच्या खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: FodderScam, Lalu prasad yadav