नितीश कुमार यांनी बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला

नितीश कुमार यांना 131 मतं मिळाली आहे तर त्यांच्याविरूद्ध 108 मतं पडली आहेत. बहुमताचा आकडा 122 अाहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2017 01:35 PM IST

नितीश कुमार यांनी बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला

पाटणा,28 जुलै: गुरूवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज नितीश कुमारांनी बिहारच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. राज्यपालांनी शपथविधीनंतर दोन दिवसात त्यांना बहुमत सिद्ध करायचं आव्हान दिलं होतं.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या बाजूने 131 मतं पडली आहेत तर त्यांच्या विरोधात 108 मतं पडली आहेत. बहुमताचा आकडा 122 अाहे. बुधवारी 132 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र नितीश कुमारांनी राज्यपालांना दिलं होतं.  दरम्यान भाजपशी हातमिळवणी केल्यामुळे देशभरातून नितीश कुमारांवर टीका होते आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2017 08:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...