Home /News /national /

राजस्थानमध्ये राजकीय नाट्याचा नवा अंक, अशोक गहलोत 'गेम फिनिश' करण्याच्या तयारीत!

राजस्थानमध्ये राजकीय नाट्याचा नवा अंक, अशोक गहलोत 'गेम फिनिश' करण्याच्या तयारीत!

जर अशोक गहलोत यांनी बहुमत सिद्ध केलं तर राज्य सरकारवर आलेले राजकीय संकट दूर होईल आणि ज्या 19 आमदारांनी बंड पुकारले आहे, त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा मार्गही मोकळा होईल.

    जयपूर, 19 जुलै : राजस्थानमध्ये गेल्या आठवड्याभरापासून राजकीय हालचालींनी अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. सचिन पायलट यांच्या बंडामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. परंतु, आता मुख्यमंत्री अशोक गहलोत या वादाच्या अंकावर पडदा टाकण्याच्या तयारीत आहे. येत्या बुधवारी गहलोत बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गहलोत  (Ashok Gehlot) यांनी मागील शनिवारी संध्याकाळी राज्यपाल कलराज मिश्र यांना भेटून 103 आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र दिले आहे. परंतु, अद्यापपर्यंत राजभवनाकडून ही फक्त एक सदिच्छा भेट होती, असं सांगण्यात आलं आहे. मात्र, राज्यपाल आणि गहलोत यांच्या भेटीमुळे राजस्थानमध्ये वेगवेगळ्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. अनलॉकनंतर पुन्हा लॉकडाऊन का? उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितलं कारण अशोक गहलोत यांनी राज्यपालांना राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर येत्या बुधवारी विशेष विधानसभा अधिवेशन बोलवण्याची इच्छा बोलून दाखवली, अशी माहितीही सूत्रांनी दिली. येत्या बुधवारी विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते आणि यावेळी गहलोत हे बहुमत सिद्ध करतील. गहलोत यांनी आपल्याला103 आमदाराचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. यात काँग्रेसचे 88, बीटीपी  02, सीपीएम 02, आरएलडी  01 आणि 1  अपक्ष आमदाराचा समावेश आहे. कोरोनाच्या संकटात मोठी संधी, डिसेंबरपर्यंत पोलीस दलात 12 हजार पदांची भरती जर अशोक गहलोत यांनी बहुमत सिद्ध केलं तर राज्य सरकारवर आलेले राजकीय संकट दूर होईल आणि ज्या 19 आमदारांनी बंड पुकारले आहे, त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा मार्गही मोकळा होईल. या आमदारांविरोधात काँग्रेसचे नेते महेश जोशी यांनी व्हिप जारी करून तक्रार केली आहे. तसंच विधानसभा सभापती सीपी जोशी यांनीही या आमदारांना नोटीस बजावली आहे. आता या आमदारांविरोधात सोमवारी कोर्टात सुनावणी होणार आहे. मागील आठवड्यात सभापतींनी दिलेल्या निर्णयावर कोर्टाने स्थगितीही दिली आहे. त्यामुळे सोमवारी कोर्ट काय निर्णय देतो हेही पाहण्याचे ठरणार आहे.   सचिन पायलट यांनी धुडकावली प्रियांका गांधींची ऑफर दरम्यान, दुसरीकडे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सचिन पायलट यांना फोन करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसंच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबत भेट घालून देण्याची ऑफर दिली. मात्र, सचिन पायलट यांनी ही ऑफर धुडकावबन लावली. लॉकडाउन का लावला? कलेक्टर, कमिश्नर हाजीर हो; कोर्टाचे आदेश 'मला मुख्यमंत्रिपद देऊन याबाबतची घोषणा सार्वजनिकरित्या करा...अन्यथा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना भेटण्यात काहीच अर्थ नाही,' अशी भूमिका सचिन पायलट यांनी घेतल्याचं सांगण्यात येत आहे. अशोक गहलोत Vs सचिन पायलट! राजस्थानमध्ये भाजपच्या वसंधुरा राजे सरकारचा पाडवा करत काँग्रेस बहुमताने सत्तेत आली. त्यानंतर अनुभवी आणि गांधी घराण्याशी जवळ असलेले अशोक गहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यावेळीही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले सचिन पायलट कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळे खुद्द राहुल गांधी यांना मध्यस्थी करावी लागली होती. त्यामुळे पायलट यांना उपमुख्यमंत्री देण्यात आले होते. पण, दोन्ही नेत्यांमध्ये वाद चांगलाच पेटला होता. अखेर दोन दिवसांपूर्वी सचिन पायलट यांनी 30 समर्थक आमदारांना घेऊन बंडाचे निशाण फडकवले. आज सचिन पायलट हे जवळपास भाजपवासी होणार हे निश्चितही झाले होते. 'विजयदुर्ग'ची पडझड, इन्स्टाग्रामवर पोस्ट पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून आदेश पण, अशोक गहलोत एवढ्यात हार मानतील, असेही नव्हते. गहलोत यांनी तातडीने सर्व समर्थक आमदारांची आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली. घोडेबाजार होऊ नये म्हणून सर्व आमदारांना ताब्यात घेतले. एकूण 103 आमदार गहलोत यांनी आपल्या बाजूने उभे केले. राजस्थान विधानसभेत 200 सदस्यांची जागा आहे. त्यामुळे गहलोत यांनी बहुमताला लागेल एवढी संख्या गोळा करून दाखवली. काँग्रेस पक्षानेही सचिन पायलट यांची मनधरणी केली पण, त्यात काही यश आले नाही. सचिन पायलट आपल्या मागणीवर ठाम राहिली. अखेर, काँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून काढून टाकले. त्यांच्यासह इतर 3 मंत्र्यांवरही थेट कारवाई केली. परंतु, सचिन पायलट यांनी भाजपमध्ये जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भाजपलाही कोणताही खेळी करता आली नाही.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: सचिन पायलट

    पुढील बातम्या