S M L

बिहार, आसाम, नेपाळमध्ये पुराचं थैमान

बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पुरामुळे हाहाकार माजला आहे. आसाम, नेपाळ, बांग्लादेशमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आलाय.

Sonali Deshpande | Updated On: Aug 16, 2017 04:01 PM IST

बिहार, आसाम, नेपाळमध्ये पुराचं थैमान

16 आॅगस्ट : बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पुरामुळे हाहाकार माजला आहे. पुराचं पाणी विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरू लागलं आहे. तर या महापुरामुळे बिहारमध्ये आत्तापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ५६ वर गेली आहे. तर सुमारे ७० लाख लोक पूरग्रस्त झाले आहेत.

मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा राज्यातील पूरस्थितीची पाहणी केली. बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार १३ जिल्ह्यांमधील ९८ तालुके आणि १०७० गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे.

आसाम,नेपाळ, बांग्लादेशमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आलाय. तसंच भूस्खलन झालं आहे.  आसाममध्ये यामुळे 21 जणांचा बळी गेल्याची माहिती आहे. आसामच्या वेगवेगळ्या भागात पुराचा खूप मोठा फटका बसला आहे तर नेपाळमध्येही आतापर्यंत 120 लोकांचा जीव गेला आहे.

35 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. पुराच्या तडाख्याने हजारो कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आलंय. या सगळ्याच ठिकाणी सैनिकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 10:15 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close