नवी दिल्ली 18 ऑगस्ट: कोरोनाचं संकट देशात कायम असताना (Coronavirus in India) मद्य प्रेमिंसाठी आता Flipkartसुद्धा Home Delivery सुरु करणार आहे. दररोज लगाणाऱ्या वस्तूंसाठी Flipkart या E-Commerce Platform चा वापर केला जातो. मात्र आता नवी गरज ओळखून Flipkartने हे नवं काम सुरु केलंय. फ्लिपकार्ट स्टार्टअप डियाजिओ (Diageo)सोबत ही सुरुवात करणार आहे. सध्या फक्त ओडिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ही सुरुवात होणार आहे.
दरम्यान काही विमान कंपन्यांनी मात्र कोरोनामुळे विमानात मद्यापानाला बंदी घातली आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे जगभर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. देशोदेशीच्या विमान कंपन्यांना त्याचा फटका बसला आहे. त्यातच सोशल डिस्टन्सिंगमुळे विमानात कमी प्रवासी न्यावे लागत आहेत.
त्यामुळे अनेक देशांच्या विमान कंपन्यांनी विमानात देण्यात येणारी दारु बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसोबत कमीत कमी संबंध यावेत यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं कारण या विमान कंपन्यांनी दिलं आहे.
अमेरिका, ब्रिटन, त्याचसोबत युरोपच्या अनेक कंपन्यांनीही अशाच प्रकारचा निर्णय घेत विमानातलं पेयपान बंद केलं आहे. जगभर काही देशांचा अपवाद वगळता आंतरराष्ट्रीय विमानसेवा अजुनही बंद आहेत. तर देशांतर्गत सेवा मात्र सुरू करण्यात आलेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.