मुंबई, 13 मार्च : खाजगी विमान कंपनी जेट एअरवेजनं बोईंग 737 MAXच्या उड्डाणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वी इथियोपीयन विमान बोईंग 737 मॅक्स 8 नं उड्डाण केलं. 8600 फूट उंचावर गेल्यावर अचानक 441 किमी. प्रति तासाच्या वेगात ते खाली येऊन कोसळलं. या दुर्घटनेत चार भारतीयांबरोबर 157 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतानं बोईंग 737 मॅक्सवर बंदी घातली आहे.
भारताच्या या बंदीचा परिणाम थेट स्पाइस जेट आणि जेट एअरवेजवर पडलाय. स्पाइसकडे अशी जवळजवळ 12 आणि जेट एअरवेजकडे 5 विमानं आहेत. या बंदीचा फटका फ्लाइट्सवर पडेल, अशी चर्चा आहे. स्पाइसजेटनं सांगितलं की प्रवाशांना होणारी असुविधा दूर करण्याचा ते प्रयत्न करतायत.
भारतात विमान कंपन्या वेगवेगळ्या संकटांमधून जातायत. अनेक विमानांचं उड्डाण होत नाहीय. तात्काळ विमानसेवेचा दर नेहमीपेक्षा जास्त आहे. बोईंग 737 मॅक्स 8 वर बंदी घातल्यामुळे यात अजून दरवाढ होणार आहे.
इंडिगो आणि गो एअर संकटात
इंडिगोकडे पायलट्स कमी आहेत. म्हणून कंपनीला एप्रिल महिन्यातली सुरुवातीची उड्डाणं रद्द केलीयत. गो एअरही त्यांच्या काही विमानांची उड्डाणं रद्द करतंय.
एअर इंडियाची 23 विमानं आजारी
सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची जवळजवळ 23 विमानं बिघाडांमुळे उडू शकत नाहीत. कंपनीला पैसे मिळत नाहीयत. त्यामुळे विमानाच्या इंजिन खरेदीच्या पैशांसाठी एअर इंडियाचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीला आशा आहे की इंजिनांची खरेदी होऊ शकली, तर त्यांची विमानं दिल्लीहून थेट लाॅस एंजलीसला जाऊ शकतं.
Directed Secy to hold an emergency meeting with all Airlines to prepare a contingency plan to avoid inconvenience to passengers. While passenger safety is a zero tolerance issue, efforts are already on to minimise the impact on passenger movement as their convenience is important https://t.co/9ZlJXFzvGY
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) March 12, 2019
नागरी हवाई मंत्री सुरेश प्रभू यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेणार आहेत. त्यांनी ट्विट करून आपत्कालीन बैठकीबद्दल सांगितलं. विमानाच्या वाढत्या तिकीट दरांबद्दल त्यांना चिंता आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, प्रवाशांना असुविधा होऊ नये म्हणून एक योजना तयार केली जाईल. विमान सुरक्षेवर लक्ष केंद्रित करूनही विमान उड्डाणं कमी होणार नाहीत, हे पाहिलं जाईल.
लग्नासाठी फोटोग्राफर ठरवताय? मग हे प्रश्न त्याला न विसरता विचारा