बिअरच्या किमतींमध्ये फिक्सिंग! 11 वर्षांपासून जास्त दरात खरेदी करत आहेत मद्यपी

बिअरच्या किमती फिक्स करणाऱ्या या कंपन्यांमध्ये अनेक प्रसिद्ध ब्रँडचाही समावेश आहे.

बिअरच्या किमती फिक्स करणाऱ्या या कंपन्यांमध्ये अनेक प्रसिद्ध ब्रँडचाही समावेश आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 11 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय बिअर कंपन्या Carlsberg, SABMiller आणि भारतीय कंपनी United Breweries यांच्यामध्ये अंतर्गत वाटाघाटी करीत भारतात गेल्या 11 वर्षांपासून बिअर किंमतींमध्ये मनमानी कारभार केला जात असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. सीसीआयच्या (The Competition commission of india) एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. न्यूज एजन्सी राॅयटर्सच्या एका बातमीनुसार बिअर कंपन्यांच्या टॉप अधिकाऱ्यांनी व्यवसायातील संवेदनशील माहिती शेअर केली आणि एकत्रितपणे 11 वर्षांपर्यंत देशातील बिअरच्या किमती फिक्स केल्या. रॉयटर्सने दावा केला आहे की, त्यांनी सीसीआयचा रिपोर्ट पाहिला आहे. मात्र अद्याप सीसीआयचा यावर कोणताही आदेश आलेला नाही. सीसीआयचे वरिष्ठ अधिकारी यावर काय निर्णय घेणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रिपोटनुसार 2007 ते 2018 दरम्यान हा मनमानी कारभार केला गेला आहे. सीसीआयच्या 248 पेजच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, ‘ब्रूअर्स यांनी एकत्रितपणे सरकारी मशिनरीचा दुरुपयोग केला आणि त्यांना ही बाब माहिती होती की त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये सीसीआयच्या कायद्याचं उल्लंघन केलं जात होतं. सीसीआयने 2018 मध्ये या तीन बिअर कंपन्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली होती व तपास सुरू केला होता. या तपासामध्ये या कंपन्यांवर सवाल उपस्थित करण्यात आला होता. सीसीआयचे सर्व वरिष्ठ अधिकारी याबाबत विचार करीत आहे आणि त्या कंपन्यांवर 25 कोटी डॉलरहून अधिक दंड लावू शकतात. या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये संभाषण, व्हॉट्सअप मेसेज आणि ई-मेल सीसीआयच्या रिपोर्टमध्ये सामील करण्यात आला आहे. यानुसार या कंपन्यांनी एकमेकांमध्ये तालमेल ठेवत अनेक राज्यात किंमती वाढविण्यासाठी रणनीती तयार केली आणि एकमेकांना मदत करुन किंमती ठरवल्या. त्यानंतर AIBA ने किंमती वाढविण्यासाठी या कंपन्यांकडून लॉबिंग केली.
    Published by:Akshay Shitole
    First published: