वडिलांशेजारी झोपलेल्या 5 वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण; बलात्कार करून हत्या

वडिलांशेजारी झोपलेल्या 5 वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण; बलात्कार करून हत्या

Rape On Minor Girl : वडिलांच्या बाजुला झोपलेल्या मुलीचं अपहरण करून तिचा बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उज्जैनमध्ये घडली आहे.

  • Share this:

भोपाळ, 08 जून : मध्य प्रदेशमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. कारण, उज्जैनमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. उज्जैनमध्ये पाच वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात करण्यात आली. अपहरण करण्यात आलेल्या मुलीचे आई – वडील हे मजूर म्हणून काम करतात. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांच्या बाजुला झोपलेली असताना चिमुरडीचं अपहरण करण्यात आलं.

वडिलांची नोकरी पुन्हा मिळावी यासाठी 13 वर्षाच्या मुलाची नरेंद्र मोदींना 37 पत्रं

काय आहे घटना?

वडिलांच्या बाजुला मुलगी झोपली होती. मध्यरात्री दोन वाजता मुलीच्या वडिलांचे डोळे उघडले. त्यावेळी मुलगी गायब असल्याचं वडिलांच्या लक्षात आलं. त्यानंतर कुटुंबानं मुलीचा शोध सुरू केला. रात्रभर शोध घेतल्यानंतर देखील मुलीचा थांगपत्ता काही लागला नाही. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी देखील तक्रार दाखल केल्यानंतर मुलीचा शोध सुरू केला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी मुलीचा मृतदेह लालपुलाजवळ शिप्रा नदीच्या जवळ आढळून आला.

कुटुंबाकडून दुर्लक्षित होत असल्याची भावना; डॉक्टरनं विष देऊन भाव, भाचीचा घेतला जीव

मुलीच्या अंगावर नव्हते कपडे

पोलिस ज्यावेळी घटनास्थळी पोहोचले तेव्हा मृतदेहावर कपडे नव्हते. शिवाय, डोक्याला देखील गंभीर इजा झाली होती. डॉक्टरांनी मुलीवर बलात्कार झाला असल्याची माहिती दिली. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत असून त्यांनी मजुरांची देखील चौकशी सुरू केली आहे.

SPECIAL REPORT: न्यायालयाच्या प्रत्येक प्रश्नावर साध्वी प्रज्ञा यांचं एकच उत्तर

First published: June 8, 2019, 11:01 AM IST
Tags: Rape

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading