Home /News /national /

संशयास्पद पद्धतीनं घरात सापडला 5 जणांचा मृतदेह, आत्महत्या की आणखीन काही...

संशयास्पद पद्धतीनं घरात सापडला 5 जणांचा मृतदेह, आत्महत्या की आणखीन काही...

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्यांमध्ये दोन मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी सध्या तपास सुरू आहे.

    कोलकाता, 08 ऑक्टोबर : एकाच घरात 5 जणांचे मृतदेह संशयास्पद पद्धतीनं सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेनं पश्चिम बंगाल हादरलं असून हत्या की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. याआधी दिल्लीमध्ये संशयास्पद पद्धतीनं गेल्या वर्षी 11 जणांचे मृतदेह एकाच घरात सापडले होते. त्याचं गूढ अद्यापही उकललं नाही आणि आता पश्चिम बंगालमध्ये देखील हा भयंकर प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये एकीकडे निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याच दरम्यान होणाऱ्या राजकीय चकमकी आणि वाद यामधून नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ले होत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं एकच खळबळ उडाली. पश्चिम बंगालमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राज्यातील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात जमालपूर गावात रविवारी एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत सापडले. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्यांमध्ये दोन मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी सध्या तपास सुरू आहे. हे वाचा-धक्कादायक! ऑन ड्युटी शिपायानं बार गर्लवर पैसे उडवत स्टेवर लगावले ठुमके आनंदबाजार वेबसाइटनुसार मृतांची नावं 60 वर्षीय उलोबाला बर्मन, 32 वर्षीय अनु बर्मन, 26 वर्षीय मल्लिका बर्मन, 10 वर्षीय ब्यूटी बर्मन आणि 6 वर्षांचा स्निग्धा बर्मन अशी आहेत. याप्रकरणी तपास करत असताना पोलिसांनी आत्महत्या नसून हत्या असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला आहे. या 5 ही जणांची हत्या झाल्याचं दिसत आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 5 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल आल्यानंतर तपासाची दिशा ठरवण्यात येईल.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Kolkata

    पुढील बातम्या