मराठी बातम्या /बातम्या /देश /

निर्दयीपणाचा कळस, पाच भटक्या कुत्र्यांवर अॅसिड टाकून तडफडवून ठार मारलं

निर्दयीपणाचा कळस, पाच भटक्या कुत्र्यांवर अॅसिड टाकून तडफडवून ठार मारलं

मोकाट जनावरांवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. असाच एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. पाच भटक्या कुत्र्यांवर अॅसिड (acid attack on dog) टाकून त्यांची निर्दयीपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली

  • Published by:  News18 Desk

उज्जैन, 04 सप्टेंबर : पशु-प्राणीमात्रांवर दया दाखवावी, असं सांगितलं जात असलं तरी काही समाजकंटक विनाकारण प्राण्यांना त्रास देत असतात. मोकाट जनावरांवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. असाच एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. पाच भटक्या कुत्र्यांवर अॅसिड (acid attack on dog) टाकून त्यांची निर्दयीपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मध्यप्रदेशच्या उज्जैनमध्ये ही घृणास्पद घटना घडली आहे. पाच भटक्या कुत्र्यांवर अॅसिड टाकून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती मध्यप्रदेश पोलिसांनी दिली. उज्जैनचे पोलीस अधीक्षक सतेंद्र शुक्ला यांनी सांगितले की, पीपल फॉर अॅनिमल्स (पीएफए)च्या सदस्य प्रियांशु जैन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी उशिरा नागझिरी पोलीस ठाण्यात अज्ञात विकृत व्यक्तीविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.

हे वाचा - पंजशीरमध्ये कब्जा मिळवल्यानंतर तालिबानचा हवेत गोळीबार करत जल्लोष, गोळीबारात अनेकांचा मृत्यू

येथील महालक्ष्मी नगरातील रहिवासी ब्रिजराज परिहार यांनी शुक्रवारी सकाळी रस्त्यावर कुत्र्यांना वेदनेने तडफडून मरताना पाहिले. परिहार यांना या कुत्र्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. तेथून त्यांना उपचारांसाठी इंदूरला पुढे पाठवण्यात आले, मात्र तिथे गेल्यानंतर या कुत्र्यांचा मृत्यू (dog death) झाला.

हे वाचा - चहा मागितल्यानं सासूला दिली जबरी शिक्षा; बुलडाण्यातील सुनेचं अमानुष कृत्य आलं समोर

संध्याकाळी पीएफए ​​सदस्य प्रियांशु जैन यांना घटनेची माहिती मिळाल्यावर त्या परिहारकडे तक्रार दाखल करण्यासाठी उज्जैनला आल्या. प्राण्यांविरोधातील हा सर्वात वाईट गुन्हा आहे. कुत्र्याला असे करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे, असे जैन म्हणाल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलीस आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

First published:

Tags: Dog