VIDEO : मोदींनी पूर्ण केलं फिटनेस चॅलेंज, पहा हा व्हिडिओ

VIDEO : मोदींनी पूर्ण केलं फिटनेस चॅलेंज, पहा हा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'हम फिट तो इंडिया फिट' चॅलेंजसाठीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'हम फिट तो इंडिया फिट' चॅलेंजसाठीचा व्हिडिओ शेअर केला आहे. देशाचे क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सुरू केलेल्या फिटइंडिया चॅलेंजचा हा भाग आहे.

या व्हिडिओमध्ये मोदी पंतप्रधान निवासस्थानातील अंगणात चालत, व्यायाम, योग, प्राणायाम करताना दिसताहेत. आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मणिका बत्रा यांना टॅग करत चॅलेंज केलं आहे.

व्यायाम करतानाचा हा व्हिडिओ मोदींनी ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहलं की, 'मी ज्या ट्रॅकवर चालत आहे, तो प्रकृतीच्या 5 घटकांपासून म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांपासून प्रेरित आहेत.'

राज्यवर्धनसिंग राठोड यांनी साधारण महिनाभरापूर्वी ट्विटरवर डिप्स मारतानाचा विडिओ शेअर केला होता आणि त्यात क्रिकेटर विराट कोहलीला टॅग केलं होतं. ते चॅलेंज स्वीकारत विराटनं टाकलेल्या व्हिडिओत पंतप्रधान मोदींना टॅग केलं. ते स्वीकारत मोदींनी आज हा विडिओ शेअर आहे.

First published: June 13, 2018, 10:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading