भारताने 1971 च्या युद्धानंतर पहिल्यांदाच पार केली नियंत्रण रेषा

कारगिल युद्धामध्येही भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा पार केली नव्हती.

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 06:28 PM IST

भारताने 1971 च्या युद्धानंतर पहिल्यांदाच पार केली नियंत्रण रेषा

नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : भारतीय हवाई  दलाच्या ‘मिराज’ लढाऊ विमानांनी  पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हल्ला चढवला आणि 1971 नंतर पहिल्यांदाच नियंत्रण रेषा पार केली.  याआधी कारगिल युद्धामध्येही भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा पार केली नव्हती.

काश्मीरमधल्या पुलवामा हल्ल्यानंतर दोनच आठवड्यात हा हल्ला करून भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. आज पहाटे साडेतीन वाजता ‘मिराज’ विमानं पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसली आणि त्यांनी जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केले. या 12 लढाऊ विमानांनी दहशतवादी तळांवर १००० किलोंचा बॉम्ब वर्षाव केला.

1971  च्या बांग्लादेश युद्धात याच प्रकारे हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडली होती. कारगिल युद्धामध्येही हवाई दलाने एवढ्या तीव्रतेची चढाई केली नव्हती. दुसऱ्या देशाच्या हवाई हद्दीमध्ये घुसून अशी कारवाई करायची असेल तर मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगावी लागते. याच सावधगिरीने हा हल्ला करण्यात आला आहे.

नियंत्रण रेषेच्या जवळ असलेली चिकोटी आणि मुझफ्फराबाद इथल्या दहशतवादी तळांवर हा हल्ला झालाच पण ही विमानं थेट बालाकोटच्या हद्दीत घुसली. त्यामुळेच ही भारताने फक्त नियंत्रण रेषा ओलांडलेली नाही तर पाकिस्तानवर थेट हल्ला चढवला आहे.

पाकिस्तानने मात्र भारताच्या लढाऊ विमानांच्या हल्ल्याला तेवढंच प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यानंतर भारताच्या विमानांनी माघार घेतली आणि निघताना घाईघाईने बॉम्बहल्ला केला, असंही पाकिस्तानचं म्हणणं आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 04:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...