Home /News /national /

त्या घटनेआधी नेमकं काय घडलं? CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातापूर्वीचा EXCLUSIVE VIDEO

त्या घटनेआधी नेमकं काय घडलं? CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातापूर्वीचा EXCLUSIVE VIDEO

व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर हवेत असतानाच समोर असलेल्या दाट धुक्यांमध्ये गेल्याचं पाहायला मिळतं. यानंतर काहीच क्षणांत हेलिकॉप्टरच्या इंजिनचा येणारा आवाज बंद होतो.

नवी दिल्ली 09 डिसेंबर : तमिळनाडूमध्ये बुधवारी लष्काराचं एक हेलिकॉप्टर कोसळून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत देशाचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचं निधन झालं. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण प्रवासी करत होते. यामध्ये बिपीन रावत, बिपीन रावत यांच्या पत्नी, लष्कराचे काही अधिकारी तसेच इतर सुरक्षारक्षक, कमांडोज उपस्थित होते. आता हे हेलिकॉप्टर कोसळण्याआधी नेमकं काय घडलं हे दाखवणारा पहिला व्हिडिओ समोर आला आहे (Video Before IAF helicopter Crash) व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर हवेत असतानाच समोर असलेल्या दाट धुक्यांमध्ये गेल्याचं पाहायला मिळतं. यानंतर काहीच क्षणांत हेलिकॉप्टरच्या इंजिनचा येणारा आवाज बंद होतो. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याआधीचा हा एकमेव व्हिडिओ हाती लागला आहे. यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसोबत एका कार्यक्रमासाठी तमिळनाडूला गेले होते. वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सेजचं कॉलेज आहे. जेथे सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. तेथून ते हेलिकॉप्टरने कुन्नूर येथे येत असताना कुन्नूर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. कुन्नूर येथून बिपीन रावत हे दिल्लीला जाणार होते. मात्र, कुन्नूर येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातानंतर लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Airplane, Helicopter, Tamil nadu

पुढील बातम्या