मराठी बातम्या /बातम्या /देश /आधी लसीकरण मग परीक्षा; तिसऱ्या लाटेपूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांना लस द्या, या उपमुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

आधी लसीकरण मग परीक्षा; तिसऱ्या लाटेपूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांना लस द्या, या उपमुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी रविवारी केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत इयत्ता बारावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना प्राधान्यानं लस (12th grade student vaccination) देण्याची मागणी केली आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी रविवारी केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत इयत्ता बारावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना प्राधान्यानं लस (12th grade student vaccination) देण्याची मागणी केली आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी रविवारी केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत इयत्ता बारावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना प्राधान्यानं लस (12th grade student vaccination) देण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली, 23 मे: सध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनं (Coronavirus 2nd Wave) अक्षरशः थैमान घातलं आहे. कोरोना विषाणू साथीचा शिक्षण क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा (Exams) रखडल्या आहेत. तर काही राज्यात परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करण्याचा धडाका लावला आहे. अशातच दिल्लीचे शिक्षणमंत्री आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी रविवारी केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत इयत्ता बारावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना प्राधान्यानं लस (12th grade student vaccination) देण्याची मागणी केली आहे.

यावेळी ते म्हणाले की, देशात कोरोना विषाणूची तिसरी लाट (3rd Wave) आली तर, विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. त्यामुळे दिल्ली सरकार कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेण्याच्या बाजूनं नाही. सर्व विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा लसीकरण होणं आवश्यक आहे. त्यानंतरचं परीक्षा घेणं सुरक्षित असू शकेल.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पुढे म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं आयोजन करण अत्यंत घातक ठरू शकतो. अशी चूक देशासाठी खूपच महागात पडू शकते. केंद्र सरकारनं प्राधान्यानं विद्यार्थ्यांचं लसीकरण करायला हवं. त्यासाठी लस उत्पादक कंपनी फायझरशी यासंदर्भात बोलायला हवं. देशभरातील सर्व 1.4 करोड 12 वीच्या विद्यार्थ्यांचं आणि जळपास तितक्याचं शिक्षकांचं लसीकरण करायला हवं. केंद्र सरकारनं जर लस उपलब्ध करुन दिली. तर राज्य सरकारे एका आठवड्याच्या कालावधीत 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लस देऊ शकतील. त्या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे.

हे वाचा-चिंताजनक..! कोरोना विषाणूचा दुसऱ्या लाटेत सर्वाधिक तरुणांचा मृत्यू

त्याचबरोबर, दिल्लीत अवघ्या दोन दिवसांत बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांच लसीकरण करू शकतो, असा विश्वासही मनीष सिसोदिया यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, माझ्या मते बारावीत शिकणारे सुमारे 95% विद्यार्थी 17.5 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना 18 वर्षांपुढील नागरिकांना दिली जाणारी लस यांनाही दिली जाऊ शकते का? याबाबत  केंद्र सरकारनं तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

First published:

Tags: Board Exam, Corona vaccine, Coronavirus, Student