भारतीय लष्काराची ताकद वाढली, 'बोफोर्स हॉविट्झर' तोफा दाखल

भारतीय लष्काराची ताकद वाढली, 'बोफोर्स हॉविट्झर' तोफा दाखल

1980 नंतर पहिल्यांदाच बोफोर्स तोफा भारतात दाखल झाल्या आहेत. 2 तोफा अमेरिकेहून विमानानं भारतात आल्या आहेत. अशा 130 तोफा लष्करात दाखल होणार आहेत.

  • Share this:

18 मे : भारतीय लष्काराला आता आणखी बळकट मिळणार आहे. नव्या कोऱ्या बोफोर्स हॉविट्झर तोफा भारतात दाखल झाल्या आहेत.

अमेरिकेच्या बीएई कंपनीच्या या तोफा आहेत. 155 एमएम बोर अल्ट्रा लाईट लाँग रेज तोफ असं हिचं नाव आहे. एका तोफेचं वजन 4 टन आहे. आज त्याचं पोखरणच्या टेस्टिंग रेंजमध्ये चाचणी झाली.

25 ते 40 किलोमीटरपर्यंत याची रेंज आहे. सर्व बोफोर्स या काश्मीरमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. 1980 नंतर पहिल्यांदाच बोफोर्स तोफा भारतात दाखल झाल्या आहेत. 2 तोफा अमेरिकेहून विमानानं भारतात आल्या आहेत. अशा 130 तोफा लष्करात दाखल होणार आहेत. पण त्या भारतात बनवल्या जातील. बीएईनं महिंद्रा अँड महिंद्राशी यासाठी करार केलाय.

First published: May 18, 2017, 11:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading