मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंतप्रधान मोदी रचणार इतिहास, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद भारताकडे

पंतप्रधान मोदी रचणार इतिहास, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद भारताकडे

स्वतंत्र भारताच्या इतिसाहात पहिल्यांदाच (In the history of independent India) भारतीय पंतप्रधान (Indian Prime Minister) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या (UNSC) बैठकीचं अध्यक्षपद (Chairman) भूषणवणार आहेत.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : स्वतंत्र भारताच्या इतिसाहात पहिल्यांदाच (In the history of independent India) भारतीय पंतप्रधान (Indian Prime Minister) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या (UNSC) बैठकीचं अध्यक्षपद (Chairman) भूषणवणार आहेत. याद्वारे भारत सरकार आंतरराष्ट्रीय राजकारणात एक पाऊल पुढं टाकत असून नवा इतिहास रचणार असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांतील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी दिली आहे.

1 ऑगस्टपासून भारताचा समावेश

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं दोन वर्षांचं अस्थायी सदस्यत्व भारताला मिळालं असून 1 ऑगस्ट 2021 पासून भारताचा सुरक्षा परिषदेत अधिकृत प्रवेश झाला आहे. या काळात भारत सागरी सुरक्षा, हवाई सुरक्षा आणि जमिनीवरील सीमा सुरक्षेच्या बाबतीत काही महत्वपूर्ण बैठकांचं नियोजन करण्याची शक्यता आहे.

भारताला बहुमान

सैयद अकबरुद्दीन यांच्या मते 9 ऑगस्टला होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषणवण्याची शक्यता आहे. असं झालं, तर तो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिला प्रसंग असेल. आतापर्यंत कुठल्याही पंतप्रधानांनी अशा प्रकारे सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी पुढाकार घेतला नव्हता. आता मात्र भारतानं सुरक्षेला अग्रक्रम दिल्याचं यातून सिद्ध होत असल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचा -देवेंद्र फडणवीसांच्या या 26 मागण्या मुख्यमंत्री मान्य करणार?

आठव्यांदा सदस्यत्व

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व भारताला मिळण्याची ही आठवी वेळ आहे. या काळात पंतप्रधान मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्यासह अनेकजण वेगवेगळ्या बैठकांचं अध्यक्षपद भूषवण्याची शक्यत आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण होत असताना हा बहुमान विशेष मोलाचा असल्याची चर्चा सध्या आंतरराष्ट्रीय वर्तुळात आहे.

First published:

Tags: History, PM narendra modi