'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'

'नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी'

माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला की स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी कोण होता? त्यावर मी विचार केला आणि मला वाटले की...

  • Share this:

नवी दिल्ली, 20 एप्रिल: बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक, गीतकार आणि संगीतकार विशाल भारद्वाज हे कालपासून अचानक चर्चेत आले आहेत. अर्थात भारद्वाज चर्चेत येण्यामागे कोणत्या चित्रपटासंदर्भातील कोणतेही कारण नाही. तर त्याचे ट्विटवरील एक पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत. देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. राजकीय नेत्यांसोबत चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार देखील राजकीय मते मांडत आहेत. यात आता विशाल भारद्वाज यांचा देखील समावेश झाला आहे.

विशाल भारद्वाज यांनी शुक्रवारी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ते म्हणतात, माझ्या एका मित्राने स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी कोण अशा प्रश्न विचारला? या प्रश्नानंतर त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्यांची सोशळ मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. भारद्वाज यांच्या या उत्तरामुळे काहींनी त्यांच्या या उत्तरावर टीका देखील केली आहे.

भारद्वाज यांनी ट्विटवर लिहले आहे की, माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला की स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी कोण होता? त्यावर मी विचार केला आणि मला वाटले की गोडसे. भारद्वाज यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसे याचे नाव पहिला दहशतवादी म्हणून घेतले आहे. त्यांच्या या उत्तरावर आता प्रतिक्रिया येत आहेत.

अर्थाय या ट्विटनंतर भारद्वाज यांनी आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी पहिल्या ट्विटवर प्रतिक्रिया देणाऱ्यांना उत्तर दिले आहे. ते म्हणतात, जर तुम्ही विचारसरणीच्या स्तरावर एखाद्याचा खून करता तेव्हा तुम्ही त्या लोकांच्या मते दहशत पसरवण्याचाच प्रयत्न करत असता जे तुमच्या विचारांशी सहमत नाहीत. हा दहशतवाद नाही तर काय आहे. गोडसे यांचे नाव घेतल्यामुळे ज्या लोकांनी टीका केली आहे त्यांना भारद्वाज यांनी उत्तर दिले आहे.

VIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...

First published: April 20, 2019, 9:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading