पहिल्या 'सर्जिकल स्ट्राईक'वर लष्कराचं स्पष्टीकरण, काँग्रेस पडलं तोंडघशी

पहिल्या 'सर्जिकल स्ट्राईक'वर लष्कराचं स्पष्टीकरण, काँग्रेस पडलं तोंडघशी

नरेंद्र मोदींच्या टीकेनंतर काँग्रेसने UPAच्या काळात केलेल्या 6 सर्जिकल स्ट्राईकची यादी जाहीर केली होती. मात्र अशा सर्जिकल स्ट्राईकची माहितीच नसल्याचं लष्कराने पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

  • Share this:

नवी दिल्ली 20 मे : लष्कराने केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'ची चर्चा अजुनही सुरूच आहे. काँग्रेसनेही या निवडणुकीत आम्ही सहा सर्जिकल स्ट्राईक केले असं सांगितलं होतं. मात्र पहिला 'सर्जिकल स्ट्राईक' हा 2016 मध्येच झाला असं लष्कराने पुन्हा एकदा स्पष्ट केलं. राजकारणाशी आमचं देणं घेणं नाही असं लष्कराच्या नॉदर्न कमांडचे प्रमुख रणबीर सिंग यांनी आज सांगितलं.

सिंग यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जम्मू आणि काश्मीरमधल्या लष्कराच्या मोहिमेची माहिती दिली. त्यावेळी त्यांना पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सिंग यांनी उत्तर देताना सांगितलं की, यासंबधीची माहिती आरटीआयमध्येही देण्यात आली आहे. लष्कराने पहिला सर्जिकल स्ट्राईक हा 2016मध्येच केला आहे. लष्कराकडे जो डेटा आहे त्यावरून हे स्पष्ट होतं असंही त्यांनी सांगितलं.

या विषयावर राजकीय पक्ष काय म्हणतात त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही. सरकार त्या प्रश्नांना उत्तर देईन असंही त्यांनी स्पष्ट केलं. 2016 मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन केलेल्या हल्ल्यात लष्कराने दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्वस्त केले होते. त्यात अनेक दहशतवादी मारलेही गेले होते. पीओकेमधल्या 250 किमीच्या परिसरातले दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड लष्कराने उद्वस्त केले होते.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून बालोकोटमध्ये केलेले हवाई हल्लेही लष्कराची अत्यंत मोठी कारवाई होती. या हल्ल्यात दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं. ही अतिशय धाडसी कारवाई होती असं मतही रणबीर सिंग यांनी व्यक्त केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसच्या मवाळ धोरणावर टीका करत असल्याने निवडणुकीदरम्यान काँग्रेसने युपीएच्या काळात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची यादीच जाहीर केली होती. त्यावरून वादही झाला होता. युपीएच्या काळात झालेले सर्जिकल स्ट्राईक हे कुणालाच माहित कसे नाहीत अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

First published: May 20, 2019, 5:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading