भारताचं पहिलं सोशल मीडिया App Elyments झालं लाँच, WhatsAppला देणार टक्कर

भारताचं पहिलं सोशल मीडिया App Elyments झालं लाँच, WhatsAppला देणार टक्कर

यात खासगी चॅटिंग ऑडियो-व्हिडियो कॉन्फरन्स कॉल, Elyments पेची सुविधा, त्याचबरोबर भारतीय ब्रँड्ससाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 5 जुलै: केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच 59 चिनी Appsवर बंदी घातली होती. त्यानंतर अशा प्रकारचे Apps भारतात तयार का होत नाहीत असा प्रश्न विचारला जात होता. ही चर्चा सुरू असतानाच गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर देशाचं पहिलं सोशल मीडिया App Elyments लाँच करण्यात आलं. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (M. Venkaiah Naidu)  यांनी हे App लाँच केलं. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने टाकलेलं हे पाऊस असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या 1 हजार तत्रज्ञांनी एकत्र येत हे App तयार केलं आहे. आठ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये (Indian languages) हे App असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारीच आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे App लाँच झालं आहे.

चॅटिंग, ऑडियो-व्हिडियो कॉल त्याचबरोबर ई-कामर्सची सुविधा यात असणार आहे. या स्वदेशी Appला गुगल प्ले स्टोअर (Google Play Stores) आणि Apple App Storesमधून डाऊनलोड करता येणार आहे.

लाँचिंगच्या आधी या Appच्या अनेक महिने चाचण्या घेण्यात आल्या होत्या. आत्तापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त जणांनी हे App डाउनलोड केलं आहे. यात वापरकर्त्यांचा डेटा देशातच सुरक्षित राहणार आहे.

हे वाचा - भारताची ‘कोरोना लस’ केव्हा येणार? वादावर सरकारनेच खोडला ICMRचा हा दावा

यात खासगी चॅटिंग ऑडियो-व्हिडियो कॉन्फरन्स कॉल, Elyments पेची सुविधा, त्याचबरोबर भारतीय ब्रँड्ससाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असणार आहे.

आत्मनिर्भर भारताचा नारा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेत त्यांनी देशातल्या तरुणाईला एक चॅलेंज दिलं असून जागतिक दर्जाचे Made In India App बनविण्याचं आवाहन केलं आहे. (Aatmanirbhar Bharat App Innovation Challenge ) सध्याचं युग डिजिटलचं असून एका क्लिकवर सगळी कामं आणि व्यवहार होत आहेत. कोरोनामुळे त्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. त्यामुळे विदेशी तंत्रज्ञानावर विसंबून न राहता स्वदेशाला उत्तेजन देण्यासाठी पंतप्रधानांनी हे चॅलेंज दिलं आहे.

या चॅलेंजमध्ये पहिला क्रमांक मिळविणाऱ्याला 20 लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी 15 लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 10 लाखांचं बक्षीस असून इतर अनेक बक्षिसही देण्यात येणार आहे. 18 जुलैपर्यंत प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: July 5, 2020, 10:39 PM IST

ताज्या बातम्या