18 डिसेंबर : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी या निकालावर संतुष्ट असून नाराज नाहीये अशी प्रतिक्रिया आहे.
राहुल गांधी आणि सोनिया गांधी आज संसदेत जात असताना गुजरात आणि हिमाचलच्या निकालावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी फारसं बोलणं टाळलं. मात्र, आपण या निकालावर संतुष्ट आहोत पण नाराज नाही अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली.
गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजपला बहुमत मिळालंय. निकालाच्या मजमोजणीत काँग्रेसने मुसंडी मारली होती. मात्र, काही वेळानंतर भाजपने आघाडी घेतली. ती शेवटपर्यंत कायम राहिली.
गुजरात निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. परंतु, मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला या निवडणुकीत फायदा झालाय. या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. लोकसभेत गुजरातमध्ये भाजपच्या सर्वच सर्व 26 जागांवर पराभूत व्हावं लागलं होतं. पण या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांचा टक्का वाढला आहे याचा आगामी निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल एवढं निश्चित आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा