मराठी बातम्या /बातम्या /देश /

गोडसेला हिरो म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला पहिलं बक्षीस, 'माझे आदर्श नथुराम गोडसे' विषयावर स्पर्धा..

गोडसेला हिरो म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला पहिलं बक्षीस, 'माझे आदर्श नथुराम गोडसे' विषयावर स्पर्धा..

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात म्हणणाऱ्या आणि गोडसेचा उदोउदो करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालं पहिलं बक्षीस...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात म्हणणाऱ्या आणि गोडसेचा उदोउदो करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालं पहिलं बक्षीस...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात म्हणणाऱ्या आणि गोडसेचा उदोउदो करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालं पहिलं बक्षीस...

  • Published by:  Meenal Gangurde

गांधीनगर, 16 फेब्रुवारी : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा हत्या करणारे नथूराम गोडसेवरुन राष्ट्रपितांचं राज्य गुजरातमध्ये वाद निर्माण झाला आहे. वलसाडच्या एका खासगी शाळेत वाद-विवाद स्पर्धेत मुलांसाठी तीन विषय देण्यात आले होते. यातील एक विषय 'माझे आदर्श नथुराम गोडसे' ( My Ideal Nathuram Godse) ठेवण्यात आला होता. सोमवारी झालेल्या या स्पर्धेत पहिला क्रमांक जिंकणारा विद्यार्थी या विषयावर बोलला. धक्कादायक म्हणजे तो महात्मा गांधीच्या विरोधात आणि गोडसेंच्या समर्थनार्थ बोलला आणि गोडसे आदर्श हिरो असल्याचंही म्हणाला. यानंतर गदारोळ उठला असून कारवाईची मागणी केली जात आहे. (First prize to the child who calls Godse a hero, Competition on the subject My Ideal Nathuram Godse in Gujarat school )

या प्रकरणात एक हैराण करणारी बाब समोर आली आहे. यामध्ये 5वी ते 8वी पर्यंतच्या 7 ते 12 वयोगटातील मुलांसाठी हा विषय स्थानिक पातळीवरील शासकीय अधिकाऱ्यांनी निवडला असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. या प्रकारानंतर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे.

हे ही वाचा-BJP आमदाराविरोधात गुन्हा दाखल, मुलीचं अपहरण केल्याचा आरोप

दैनिक भास्करने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या प्रकरणात कुसुम विद्यालयाच्या संचालिका अर्चनाबेन देसाईने सांगितलं की, ही स्पर्धा बाल प्रतिभा शोध कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केलं होतं. स्पर्धेची संपूर्ण तयारी सरकारी जिल्हा खेळ कार्यालयाने तयार केली होती. या स्पर्धेसाठी आमच्या शाळेने केवळ जागा दिली आणि वलसाडमधील जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या आदेशाचं पालन केलं. स्पर्धा सुरू होण्यापर्यंत आम्हाला या विषयांबद्दल माहिती नव्हतं.

स्पर्धेत या तीन विषयांचा समावेश...

पहिला विषय माय आयडियल नथूराम गोडसे, मला आकाशात उडणारे पक्षी आवडतात, वैज्ञानिक झाल्यानंतरही अमेरिकेत जाणार नाही...या तीन विषयांवर मुलांनी आपले मत मांडले.

First published:

Tags: Gujrat, Mahatma gandhi