मराठी बातम्या /बातम्या /देश /Omicron First Photo : ओमिक्रॉन व्हॅरिएंटचा पहिला फोटो प्रसिद्ध; म्युटेशन्स अधिक असल्याचं स्पष्ट

Omicron First Photo : ओमिक्रॉन व्हॅरिएंटचा पहिला फोटो प्रसिद्ध; म्युटेशन्स अधिक असल्याचं स्पष्ट

ओमिक्रॉन व्हॅरिएंटमध्ये म्युटेशन्स अधिक आहेत याचा अर्थ ती सर्व जास्तच घातक आहेत असा होत नाही, असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. ती म्युटेशन्स घातक आहेत की नाहीत, त्यामुळे प्रसाराचा वेग वाढेल का, लशी त्यावर प्रभावी ठरतील का, हे कळण्यासाठी संशोधन सुरू आहे.

ओमिक्रॉन व्हॅरिएंटमध्ये म्युटेशन्स अधिक आहेत याचा अर्थ ती सर्व जास्तच घातक आहेत असा होत नाही, असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. ती म्युटेशन्स घातक आहेत की नाहीत, त्यामुळे प्रसाराचा वेग वाढेल का, लशी त्यावर प्रभावी ठरतील का, हे कळण्यासाठी संशोधन सुरू आहे.

ओमिक्रॉन व्हॅरिएंटमध्ये म्युटेशन्स अधिक आहेत याचा अर्थ ती सर्व जास्तच घातक आहेत असा होत नाही, असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. ती म्युटेशन्स घातक आहेत की नाहीत, त्यामुळे प्रसाराचा वेग वाढेल का, लशी त्यावर प्रभावी ठरतील का, हे कळण्यासाठी संशोधन सुरू आहे.

पुढे वाचा ...

  मुंबई, 29 नोव्हेंबर : कोरोनाचा (Coronavirus) प्रसार जगात अनेक ठिकाणी कमी होत असल्यामुळे जीव भांड्यात पडत असतानाच दक्षिण आफ्रिकेतून ओमिक्रॉन (Omicron) या कोरोना विषाणूच्या नव्या व्हॅरिएंटचं (South Africa Variant) वृत्त दाखल झालं. B.1.1.529 हा कोरोनाचा नवा व्हॅरिएंट चिंतेचा असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं असून, त्याला ओमिक्रॉन असं नाव देण्यात आलं आहे. जगभरात त्यावर वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास सुरू झाला आहे. दरम्यान, रोममधल्या बाम्बिनो गेसू नावाच्या प्रतिष्ठित हॉस्पिटलने कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या व्हॅरिएंटचा पहिला फोटो तयार केला आहे. त्यातून असं स्पष्ट झालं आहे, की डेल्टा या आतापर्यंतच्या सर्वांत घातक स्ट्रेनमध्ये होती त्यापेक्षा अधिक म्युटेशन्स ओमिक्रॉन व्हॅरिएंटमध्ये आहेत. 'लाइव्ह मिंट'ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  ओमिक्रॉन व्हॅरिएंटमध्ये म्युटेशन्स अधिक आहेत याचा अर्थ ती सर्व जास्तच घातक आहेत असा होत नाही, असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. ती म्युटेशन्स घातक आहेत की नाहीत, त्यामुळे प्रसाराचा वेग वाढेल का, लशी त्यावर प्रभावी ठरतील का, हे कळण्यासाठी संशोधन सुरू आहे. मात्र आपली वंशवृद्धी चालू राहण्यासाठी कोरोना विषाणूने ओमिक्रॉनच्या रूपाने एक आसरा शोधला आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

  डेल्टा किंवा अन्य व्हॅरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हॅरिएंटचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज होऊ शकतो का, हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. तसंच, डेल्टा व्हॅरिएंट किंवा अन्य व्हॅरिएंट्सच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हॅरिएंटमुळे गंभीर स्वरूपाचं आजारपण येतं का हेही अद्याप स्पष्ट नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

  ओमिक्रॉन व्हॅरिएंट दक्षिण आफ्रिकेच्या ज्या भागांत आढळला आहे, तिथे कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण वाढलं आहे हे खरं असलं, तरी त्यामागचं कारण ओमिक्रॉन व्हॅरिएंट हे आहे, की अन्य कोणते घटक त्यासाठी कारणीभूत आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोरोना संसर्गग्रस्तांची एकंदर संख्याच वाढलेली असल्यामुळे हे झालेलं असू शकतं, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

  Omicron Variant : ओमिक्रॉन वेरिएंट किती धोकायदायक? नवा वेरिएंट शोधणारे डॉक्टर काय म्हणाले?

  ओमिक्रॉन व्हॅरिएंटपासून संरक्षण देण्यात कोरोनाप्रतिबंधक लशी किती प्रभावी ठरतील, हे समजून घेण्याचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटनेसह (World Health Organization - WHO) अन्य संस्था-संघटना करत आहेत. त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी लसीकरण केलं आहे, त्यांना या व्हॅरिएंटपासून संरक्षण मिळणार की नाही, हे अद्याप ठामपणे सांगता येणार नाही; मात्र लसीकरण महत्त्वाचं आहे, याचा पुनरुच्चार शास्त्रज्ञांनी केला आहे.

  ओमिक्रॉन हा व्हॅरिएंट डेल्टा, अल्फा आदी यापूर्वीच्या व्हॅरिएंटच्या तुलनेत जास्त संसर्गजन्य आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. म्हणजेच या व्हॅरिएंटमुळे नागरिकांना वेगाने संसर्ग होईल, असंही सांगता येत नाही किंवा ती गोष्ट नाकारताही येणार नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. RT-PCR टेस्टद्वारे हा व्हॅरिएंट ओळखला जाऊ शकतो, ही त्यातल्या त्यात जमेची बाब असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. रॅपिड अँटिजेन टेस्टसारख्या अन्य टेस्ट्सद्वारे हा व्हॅरिएंट ओळखता येणार की नाही, हे अद्याप समजलेलं नाही.

  Omicronचा धोका वाढला; परदेशातून येणाऱ्यांसाठी बदलले नियम, जाणून घ्या नवी नियमावली

  ज्या व्यक्तींना कोरोना विषाणूच्या कोणत्याही प्रकारच्या व्हॅरिएंटचा संसर्ग झाला आहे, त्यांना ओमिक्रॉनच्या संसर्गाचा धोका जास्त आहे. तसंच, पूर्वी कोरोना संसर्ग होऊन त्यातून बऱ्या झालेल्या व्यक्तींना ओमिक्रॉन व्हॅरिएंटचा संसर्ग सहजतेने होऊ शकतो, असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. म्हणूनच आधी कोरोना संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे; मात्र अद्याप या व्हॅरिएंटबद्दलची हाती आलेली माहिती फारच मर्यादित असून, येत्या काही आठवड्यांत अधिक माहिती हाती येईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Corona