Success story : पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच हिंदू मुलगी बनली पोलीस अधिकारी

Success story : पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच हिंदू मुलगी बनली पोलीस अधिकारी

पाकिस्तानात पहिल्यांदाच एक हिंदू मुलगी पोलीस अधिकारी बनली आहे. पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात राहणाऱ्या पुष्पा कोहली यांची नेमणूक असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदावर झाली आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 4 सप्टेंबर : पाकिस्तानात पहिल्यांदाच एक हिंदू मुलगी पोलीस अधिकारी बनली आहे. पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात राहणाऱ्या पुष्पा कोहली यांची नेमणूक असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदावर झाली आहे. त्यांनी सिंध लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा दिली.

पुष्पा कोहलीची या पदावर नेमणूक झाल्याची बातमी पाकिस्तानचे मानवाधिकार कार्यकर्ते कपिल देव यांनी दिली. त्यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली.

ते म्हणतात, सिंध लोकसेवा आयोगाच्य माध्यमातून स्पर्धा परीक्षा देऊन असिस्ंटट सब इन्स्पेक्टर बनणारी ही इथल्या हिंदू समुदायामधली पहिलीच मुलगी आहे.

पाकिस्तानमध्ये सुमारे 75 लाख हिंदूधर्मीय राहतात. ते इथे अल्पसंख्य आहेत. यावर्षीच्या जानेवारी महिन्यात हिंदू समुदायामधल्याच सुमव पवन बोडानी पाकिस्तानच्या पहिल्या महिला जज्ज बनल्या होत्या. त्या सिंध प्रांतात राहणाऱ्या आहेत. त्यांनी न्यायिक मॅजिस्ट्रेटच्या मेरिट लिस्टमध्ये 54 वा क्रमांक मिळवला.मार्च 2018 मध्ये पाकिस्तानी पीपल्स पार्टीच्या नेत्या कृष्णाकुमारी यांनी संसदेची निवडणूक जिंकली होती. हिंदू समुदायातून येऊन खासदार बनलेल्या त्या पहिल्याच महिला ठरल्या.

पाहा VIDEO : या गायिकेने मोदींना दिली Snake Attack ची धमकी

========================================================================================

VIDEO: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, किंग्ज सर्कलमध्ये अर्ध्या गाड्या पाण्याखाली!

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-404893" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/NDA0ODkz/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2019 06:20 PM IST

ताज्या बातम्या