देशातल्या पहिल्या निवडणुकीसाठी चाललं होतं 4 महिने मतदान आणि....

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाले. पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. पण प्रत्यक्ष पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या 1952 मध्ये. स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक कशी झाली होती माहिती आहे का?

News18 Lokmat | Updated On: Mar 30, 2019 04:03 PM IST

देशातल्या पहिल्या निवडणुकीसाठी चाललं होतं 4 महिने मतदान आणि....

मुंबई, 30 मार्च :  लोकशाहीचा आत्मा किंवा लोकशाहीचा महायज्ञ असं म्हणत देशातल्या 17 व्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एप्रिलपासून मतदान सुरू होईल. सात टप्प्यांत हे मतदान होणार आहे. स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक कशी झाली होती माहिती आहे का?

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाले. पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. पण प्रत्यक्ष पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या 1952 मध्ये. म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची सुरुवात झाली होती 25 ऑक्टोबर 1951 या दिवशी, पण मतदानाचा शेवटचा टप्पा संपला 21 फेब्रुवारी 1951 रोजी. पहिली सार्वत्रिक निवडणूक तब्बल 68 टप्प्यांमध्ये घेण्यात आली.  याचा अर्थ 68 दिवस देशाच्या वेगवेगळ्या भागात मतदान होत होतं. पहिल्या टप्प्यात मतदान झालं हिमाचल प्रदेश मध्ये. तिथल्या चिनी आणि पांगी या मतदारसंघाला पहिल्यांदा मतदान करण्याचा मान मिळाला. देशातलं सगळ्यात मोठं राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशात सगळ्यात शेवटचं मतदान पार पडलं.

या वर्षी 17व्या लोकसभेसाठी मतदान होत आहे. 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान 7 टप्प्यांत मतदान होणार आहे आणि 23 मे रोजी मतमोजणी होईल.


पहिली निवडणूक कशी होती?

Loading...

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही पद्धतीनं सरकार स्थापन करण्यासाठी 1951 साली भारतात पहिल्यांदा निवडणूक घेण्यात आली. 1951 साली भारतात आतासारखं सोशल मीडिया, टीव्ही किंवा जाहिरातींचा सुळसुळाटही नव्हता. त्याकाळात ईव्हीएमसारख तंत्रज्ञानही नव्हतं. त्यामुळे प्रचारसभा, वृत्तपत्र, फलक, पत्रक, आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रचार होत असे.

पहिल्या निवडणुकीत होते 54 पक्ष

1951 साली पहिली लोकसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत एकूण देशातील 54 राजकीय पक्ष सहभागी झाले होते. देशभरात 1 हजार 874 उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते.

त्या काळात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट अर्थातच नव्हते. 1951-52 बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला होता. मतपत्रिका व मतपेटीत टाकण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर वेगवेगळे बॉक्स ठेवण्य़ात आले होते. कोणत्याही बॉक्समध्ये मत टाकण्याचं स्वातंत्र्य मतदाराला देण्यात आलं होतं.

2019मध्ये होणाऱ्य लोकसभा निवडणुकीत पुन्हा बॅलेट पेपरचा वापर करण्यात यावा अशी मागणी विरोधक, मतदारांकडून केली जातं आहे. ईव्हीएममध्ये घोळ असल्याची विरोधकांकडून होणारी टीका आणि ईव्हीएमचा होणारा घोळ यामुळे पुन्हा एकदा व्हीव्हीपॅट आणि बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी विरोधक करत आहेत.

पहिल्या निवडणुकीबाबत या गोष्टी आहेत खास

1951-52 साली प्रत्येक मतदान केंद्रांसाठी स्वतंत्र बॅलेट पेपर बॉक्सची सुविधा उपलब्ध होती.

मतदाराला कोणत्याही मतदान केंद्रावर आपलं मत बॉक्समध्ये टाकण्याचं स्वातंत्र्य होतं.

कोणत्याही उमेदवाराला मतं देण्याचं स्वातंत्र्य पहिल्या निवडणुकीत देण्यात आलं होतं.


VIDEO: ..आणि नातीने नाकारली शहा आजोबांची भाजप टोपी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 04:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...