भारतात कोरोनानं घेतला सहावा बळी, 38 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबईपाठोपाठ बिहारमध्येही कोरोनामुळे 38 वर्षीय तरुणाचा मृत्यू.

मुंबईपाठोपाठ बिहारमध्येही कोरोनामुळे 38 वर्षीय तरुणाचा मृत्यू.

  • Share this:
    पटना, 22 मार्च : मुंबईपाठोपाठ आणखी एक धक्कादाय बातमी समोर आली आहे. मुंबईत 63 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आता बिहारमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पटनातील एम्स रुग्णालयात 38 वर्षीय तरुणावर कोरोनाचे उपचार सुरू होते. मात्र आज उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील कोरोनाग्रस्त रुग्णाचा हा पहिला आजचा दिवसातला दुसरा तर भारतातील आतापर्यंत 6 वा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 324 वर पोहोचली आहे तर महाराष्ट्रात आतापर्यंत 74 रुग्ण आढळले आहेत. पटना इथल्या एम्स रुग्णालयात कोरोनामुळे 38 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती बिहारच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. शनिवारी हा तरुण कोरोनाबाधित असल्याचं चाचण्यांनंतर समजलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी आज देशभरात जनता कर्फ्यू पाळला जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. हे वाचा-यशस्वी लढा! 24 भारतीयांनी केली COVID-19 वर मात महाराष्ट्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती आता 74वर पोहोचली आहे. काही तासांमध्ये हे आकडे वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आता संपूर्ण देशात रुग्णांचा आकडा 324वर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या काही तासांत कोरोनाचे 10 नवे रुग्ण समोर आले आहेत. यातील 6 रुग्ण मुंबईतील असून इतर 4 रुग्ण पुण्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, भारतात (India) कोरोनाव्हायरस (Coronavirus) वेगाने पसरतो आहे. काल फक्त 24 तासांत तब्बल 98 रुग्ण आढळले होते. आता यामध्ये आणखी रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 324वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 74 रुग्ण आहेत. हे वाचा-महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला, काही तासांत मुंबई-पुण्यात 10 नवे रुग्ण
    First published: