अंतराळात पत्नीनं गुन्हा केल्याची पतीची तक्रार, नासा करणार चौकशी!

अंतराळात पत्नीनं गुन्हा केल्याची पतीची तक्रार, नासा करणार चौकशी!

गुन्हा सिद्ध झाला तर अंतराळातील पहिलाच गुन्हा ठरेल. दोघांनी घटस्फोट घेतला असून आता नासा या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

  • Share this:

लंडन, 25 ऑगस्ट : अंतराळ आणि पृथ्वीच्या कक्षेबाहेरील वातावरण, तिथल्या रहस्याबद्दल अनेकांना कुतुहल असतं. पृथ्वीसारखाच दुसरा ग्रह, जीवसृष्टी इतर ग्रहावर आहे का ? याचा शोध लावण्यासाठी मानव धडपड करत आहे. मानवानं आता अंतराळात भरारी घेतली आहे. संशोधनासाठी जाणाऱ्या मानवाकडून अंतराळातही गुन्हा घडला आहे. आता अंतराळातील पहिल्या गुन्ह्याची चौकशी नासा करणार आहे. यामध्ये एका महिला अंतराळवीरा आरोप लावण्यात आला की तिनं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून होणाऱ्या नवऱ्याचं बँक खातं अॅक्सेस केलं. सध्या नासाकडून याचा तपास सुरू आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अॅनी मॅकक्लेवर तिचा घटस्फोटीत पती समर वॉर्डन याचं बँक खातं नासाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असताना अॅक्सेस केल्याचा आरोप केला आहे. वॉर्डनने मॅकक्लेनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मॅकक्लेननं पतीचं खातं चेक केल्याची कबुनली दिली आहे. मात्र, तिनं काहीही गैरव्यवहार केला नसल्याचंही म्हटलं आहे.

मॅकक्लेननं तिच्या वकीलांमार्फत सांगितलं की, ती फक्त एवढंच बघत होती की कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक आहे की नाही. वॉर्डनकडे मुलाचा सांभाळ करण्यासाठी पुरेसे पैसे आहेत की नाही हे बघत होते. मात्र, खात्यावरून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केला नसल्याचं तिच्या वकीलांनी सांगितलं.

वॉर्डन आणि मॅकक्लेन यांचं लग्न 2014 मध्ये झालं होत. वॉर्डन एअर फोर्समध्ये गुप्तचर विभागात काम करतो. चारच वर्षांत दोघात वाद सुरु झाले आणि 2018 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोघांशी संपर्क साधला जात आहे. जर आरोप सिद्ध झाला तर अंतराळात करण्यात आलेला हा पहिला गुन्हा ठरणार आहे. असे झाल्यास मॅकक्लेनला पृथ्वीवर असलेल्या कायद्यानुसार शिक्षा होईल. तिला अमेरिकेतील कायद्यानुसार शिक्षा देण्यात येईल.

डोंबिवलीत पोलीस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nasa
First Published: Aug 25, 2019 09:53 AM IST

ताज्या बातम्या