देशात पहिल्या कोरोना वॅक्सिनबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

देशात पहिल्या कोरोना वॅक्सिनबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, सध्या देशात जवळपास 3 लाख कोरोनाच्या ऍक्टिव्ह केसेस आहेत. काही महिन्यांपूर्वी देशात 10 लाख ऍक्टिव्ह केसेस होत्या. देशात 1 कोटी कोरोना केसेसपैकी 95 लाख रुग्ण बरे झाले आहेत. आपला रिकव्हरी रेट जगात सर्वात जास्त असल्याचंही ते म्हणाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना वॅक्सिनबाबत मोठी घोषणा केली आहे. पुढच्या वर्षात अर्थात जानेवारीमध्ये कोणत्याही आठवड्यात भारतात कोरोनाची पहिली लस दिली जाऊ शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, सोमवारी देशात 26,624 कोरोनाग्रस्तांची वाढ झाली, तर 341 जणांचा मृत्यू झाला. देशात मागील 24 तासात 29,690 लोक कोरोनामुक्त झाले.

आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, 'सरकार वॅक्सिनची गुणवत्ता, सुरक्षा आणि ती अचूक होण्यात कोणत्याही प्रकारची तडजोड करू इच्छित नाही. वॅक्सिनच्या गुणवत्तेमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही. मी वैयक्तिकरित्या असं म्हणू शकतो की, कदाचित जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात, सरकार भारतीयांना कोरोनाची लस देण्याच्या स्थितीत असू शकते'.

(वाचा - शेतीचा म्युजिकल फंडा, शेतात लावतो गाणी, पिकं येता भारी!)

देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. शनिवारी आरोग्य मंत्रालयाने कोरोनासंबंधी अनेक प्रश्नांची उत्तर दिली. त्यात आरोग्य मंत्रालयाने, देशात सध्या कोरोनाच्या 6 वॅक्सिनचं क्लिनिकल ट्रायल सुरू असून या लशी विकासाच्या विविध टप्प्यांवर असल्याचं सांगितलं.

आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, सध्या देशात जवळपास 3 लाख कोरोनाच्या ऍक्टिव्ह केसेस आहेत. काही महिन्यांपूर्वी देशात 10 लाख ऍक्टिव्ह केसेस होत्या. देशात 1 कोटी कोरोना केसेसपैकी 95 लाख रुग्ण बरे झाले आहेत. आपला रिकव्हरी रेट जगात सर्वात जास्त असल्याचंही ते म्हणाले.

(वाचा - आधी 3 मिनिटांत एक इनोवा बनत होती, आता 2.5 मिनिटांचं टार्गेट; कर्मचारी संपावर)

आरोग्य मंत्र्यांना, देशातील कोरोनाचा भयानक काळ संपला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना त्यांनी, हा काळ संपल्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. परंतु अद्यापही संपूर्ण सावधगिरी बाळगणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. अजूनही आपणं रिलॅक्स होऊ शकत नाही. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईत, मास्क, हँड हायजिन आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं अतिशय महत्त्वाचं असून हेच कोरोनाविरोधात मोठं हत्यार असल्याचंही ते म्हणाले.

Published by: Karishma Bhurke
First published: December 21, 2020, 10:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading