पहिला Air Strike नरेंद्र मोदींनी नाही तर वाजपेयींनी केला होता

Air Strike : भारतीय हवाई दलानं 2002 मध्ये LOC पार जात POKमध्ये दहशतवाद्यांच्या तळांना उद्धवस्त केल्याची माहिती भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यानं दिली.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 12:55 PM IST

पहिला Air Strike नरेंद्र मोदींनी नाही तर वाजपेयींनी केला होता

नवी दिल्ली, 24 जून : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं बालाकोट येथे केलेला Air Strike हा पहिला असल्याचा दावा केला जात आहे. पण, बालाकोट येथे झालेला Air Strike हा पहिला नसून यापूर्वी 2002मध्ये देखील भारतीय हवाई दलानं LOC पार केल्याची माहिती भारतीय वायु दलाचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ राजेश कुमार यांनी दिली आहे. भारतीय हवाई दलानं कारगिल युद्धावेळी पाकिस्तानमध्ये Air Strike केला होता. तर, 2002मध्ये भारतीय हवाई दलानं LOC पार करत दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केलं होतं. यासाठी मिराज विमानांचा वापर करण्यात आला होता. कारगिल युद्धाला 20 वर्षे झाल्यानिमित्त भारतीय हवाई दलाचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ राजेश कुमार मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे बोलत होते. 2 जुलै 2002 रोजी भारतीय विमानं पीओकेपासून 3 ते 4 किमी आतमध्ये गेली होती. यावेळी दहशतवाद्यांचे तळ देखील मोठ्या प्रमाणावर उद्धवस्त करण्यात आले होते. ऑपरेशन पराक्रम असं याला नाव देण्यात आलं होतं.

RBIमध्ये 6 महिन्यात दुसरा राजीनामा; विरल आचार्य यांनी पद सोडलं!

कसा झाला Air Strike

संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 29 जून 2002 रोजी POK काही संशयित हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर 1 जुलै रोजी रेकी करण्यात आली. त्यानंतर 2 जुलै रोजी मिराज विमानांच्या साहाय्यानं Air Strike करण्यात आला. यावेळी लेझर गाईडेड बॉम्ब देखील वापरण्यात आले. ग्वाल्हेर विमानतळावरून विमानांनी यावेळी उड्डाण केलं होतं.

बालाकोट Air Strike

Loading...

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोट येथे भारतीय हवाई दलानं कारवाई करत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. यामध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला होता.

विदर्भातील नेता बसणार विरोधी पक्षनेतेपदी? या आणि इतर 18 टॉप न्यूज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 12:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...