ऑस्ट्रेलियात नाइट क्लब बाहेर अंदाधुंद गोळीबार; 1 ठार

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात नाईट क्लबच्या बाहेर अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला.

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 01:06 PM IST

ऑस्ट्रेलियात नाइट क्लब बाहेर अंदाधुंद गोळीबार; 1 ठार

मेलबर्न, 14 एप्रिल : न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये 2 मशिदींवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये 49 लोक ठार झाले होते. मृतांमध्ये पाच भारतीयांचा देखील समावेश होता. 15 मार्चची ही घटना ताजी असताना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात नाईट क्लबच्या बाहेर देखील अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. यामध्ये 1 जण ठार तर, काहीजण जखमी झाल्याचं वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलं आहे. पहाटे 3 वाजून 20 मिनिटांनी हा गोळीबार करण्यात आला. लिटील चॅपेल स्ट्रीट आणि मालवर्न रोडजवळ हा नाइट क्लब आहे. नाइट क्लबचं नाव लव्ह मशीन असं आहे. दरम्यान, ही घटना दहशतवादी हल्ला आहे का? याची चौकशी आता सुरू आहे.


'भाजप नेत्यांना कसली एवढी मस्ती चढली आहे?' धनंजय मुंडे आक्रमक


हल्ल्याच्या आठवणी ताज्या

Loading...

ख्राईस्टचर्चमध्ये झालेल्या हल्ल्यापूर्वी हल्लेखोरानं फेसबुक लाईव्ह केलं होतं. ज्या मशिदींवर गोळीबार झाला होता त्यातील एका मशिदीत न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या बांगलादेश संघाचे खेळाडू होते. त्यांनी वेळीच मशिदीतून ओव्हल मैदानाकडे धाव घेत जीव वाचवला. दरम्यान, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱा तिसरा कसोटी सामना रद्द करण्यात आला होता. यानंतर हल्लेखोराला अटक देखील केली होती.


VIDEO : ...जेव्हा भर सभेत उदयनराजेंनी काढले प्राण्यांचे आवाज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: australia
First Published: Apr 14, 2019 01:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...