पाकिस्तानकडून सीमेवर रात्रभर गोळीबार, भारताचा एक जवान शहीद

पाकिस्तानकडून सीमेवर रात्रभर गोळीबार, भारताचा एक जवान शहीद

पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे.

  • Share this:

श्रीनगर, 17 डिसेंबर : भारतीय सैन्याने पुन्हा एकदा पाकिस्तानचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. घुसखोरांना जोरदार प्रत्युत्तर देताना पाकच्या दोन सैनिकांना भारतीय सैनिकांनी यमसदनी धाडलं. याशिवाय दोन ते तीन घुसखोर ठार करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे.

काश्मीरमधील राजौरी, पुंछ जिल्ह्यातीन नियंत्रण रेषेवर रात्रभर गोळीबार सुरु होता. भारतीय सैनिकांनी पाकच्या दोन चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. सध्या गोळीबार थांबला आहे. भारताच्या सैनिकांकडून परिसरात शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.

लष्कराच्या म्हणण्यानुसार सोमवारी सुंदरबनी सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न झाला होता. तो भारताच्या लष्कराने हाणून पाडला. यावेळी एक जवान शहीद झाला. त्यानंतर प्रत्युत्तर देताना पाकच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या.

गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. याशिवाय घुसखोरीचेही प्रमाण वाढले आहे. सध्या वातावरण बदलाचा फायदा घेऊन घुसखोर सीमेपलिकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत. धुक्यामुळे स्पष्ट दिसत नसल्याचा फायदा घुसखोर उचलत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2019 08:47 AM IST

ताज्या बातम्या