BREAKING: दिल्लीच्या मेट्रो स्थानकात गोळीबार, 2 जणांचा मृत्यू

दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्यातून एकमेकांवर गोळीबार करण्य़ात आल्याचं सांगण्यात आलं.

News18 Lokmat | Updated On: May 19, 2019 06:01 PM IST

BREAKING: दिल्लीच्या मेट्रो स्थानकात गोळीबार, 2 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, 19 मे : दिल्लीच्या द्वारका मेट्रो स्थानकामध्ये गोळीबार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्यातून एकमेकांवर गोळीबार करण्य़ात आल्याचं सांगण्यात आलं. या गोळीबारामध्ये एका कार चालकासह 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

दोन गटात वाद सुरू झाल्यामुळे परिसरात आधीच गर्दी झाली होती. दोन्ही गटांनी एकमेकांवर गोळीबार केला. त्यामुळे नागरिकांची धावपळ सुरू झाली. मेट्रो स्थानकात आधीच प्रवशांची वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

गोळीबार सुरू असताना पोलिसांनी यात गोळीबार केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये एका हल्लेखोर मुलाचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराचे तब्बल 15 राऊंड झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्याक आली आली आहे.

दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून परिस्थिती शांत करण्याचं काम सुरू आहे. तर पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.


Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2019 05:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...