जवानांनी 'लष्कर-ए-तोयबा'च्या कमांडरसहीत 4 दहशतवाद्यांचा केला खात्मा

जवानांनी 'लष्कर-ए-तोयबा'च्या कमांडरसहीत 4 दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मू-काश्मीरमधील तणावाच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे.

  • Share this:

श्रीनगर, 22 मार्च : जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांपासून चार ठिकाणी  जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (22 मार्च)  पहाटेच्या सुमारास शोपियान जिल्ह्यातील इमाम साहेब परिसरातही चकमक सुरू झाली आहे. परिसरातील एका घरात दोन-तीन दहशतवादी लपून बसले आहेत.

तर दुसरीकडे, बांदीपोरा येथील चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर अली भाईसहीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठार करण्यात आलेला अली भाई हा पाकिस्तानातील दहशतवादी होता.

बारामुल्ला जिल्ह्यात गुरुवारी (21 मार्च)झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातलं. दरम्यान, यामध्ये एका अधिकाऱ्यासहीत तीन जवान जखमी झाले आहेत.

दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहे.  गुरुवारीदेखील (21 मार्च) पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. सुंदरबन सेक्टर परिसरात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

VIDEO : या आहेत लोकसभेतील टाॅप लढती, कुणाविरोधात कोण लढणार?

First published: March 22, 2019, 7:09 AM IST
Tags: firing

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading