काश्मीरमध्ये पुन्हा चकमक सुरू, जवानांनी 2-3 दहशतवाद्यांना घेरलं

काश्मीरमध्ये पुन्हा चकमक सुरू, जवानांनी 2-3 दहशतवाद्यांना घेरलं

भारतीय जवानांनी 2-3 दहशतवाद्यांना घेरलं असल्याची माहिती आहे.

  • Share this:

श्रीनगर, 22 फेब्रुवारी : काश्मीरमधील सोपोर भागातील वारपोरा इथं भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू आहे. भारतीय जवानांनी 2-3 दहशतवाद्यांना घेरलं असल्याची माहिती आहे.

पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये चकचमकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच आता वारपोरा इथं दहशतवादी आणि भारतीय लष्करात पुन्हा एकदा चकमक सुरू आहे. यानंतर आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुलवामातील हल्ल्यानंतर चकमक झाली होती. या चकमकीत राष्ट्रीय रायफलचे मेजर डी.एस.डोंडियाल यांच्यासह 4 भारतीय जवान शहीद झाले. तर भारतानेही दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यामध्ये पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार गाजी रशिद याचाही समावेश असल्याची माहिती आहे.

कोण आहे गाजी रशिद ?

28 वर्षीय दहशतवादी राशिद दोन महिन्यांपूर्वी कुपवाडा मार्गे भारतात दाखल झाला होता. राशिद याने एका अफगाण युद्धात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. पाकिस्तान लष्कराच्या एका विशेष गटाने राशिदला प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तान लष्करामधील एका गटाकडून पाक व्याप्त काश्मीरमधील ऑपरेशनवर लक्ष ठेवले जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राशिदने पाकिस्तानमधील उत्तर-पश्चिम सीमा भागातील एका युद्धात सहभाग घेतला होता. अफगाणिस्तानमध्ये मुजाहिद्दीन असलेल्या गाजी राशिद हा आयईडी एक्सपर्ट होता. राशिद आणि त्याचा दोन साथीदारांनी डिसेंबरमध्ये भारतात घुसखोरी केली होती. त्यानंतर ते दक्षिण काश्मीरमध्ये लपले होते.

जैशने त्याचा कमांडर राशिदला काश्मीरमध्ये हल्ला करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती आता गुप्तचर विभागाने दिली आहे. काश्मीरमध्ये हल्ला करताना स्थानिक युवकाचा वापर केला जावा अशी जैशची योजना होती. गेल्या वर्षभरात दहशतवादाच्या मार्गावर केलेल्या अनेक युवकांना ऑपरेशन ऑलआउटमध्ये ठार मारण्यात आले आहे. यात जैशचा कमांडर मसूद अजहरच्या बहिणीचा मुलगा तल्हा आणि भावाचा मुलगा उस्मान या दोघांचा समावेश आहे. या दोघांना भारतीय लष्कराने दक्षिण काश्मीरमध्ये ठार मारले होते.


VIDEO : भारत Vs पाकिस्तान, कुणाची किती ताकद!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 08:05 AM IST

ताज्या बातम्या