पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, गोळीबाराला भारतीय सैन्याचंही चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, गोळीबाराला भारतीय सैन्याचंही चोख प्रत्युत्तर

दहशतवाद्यांनी केलेल्या कुरापतींना भारतीय सैन्याने आक्रमक प्रत्युत्तर दिल्याचंही पाहायला मिळत आहे.

  • Share this:

श्रीनगर, 4 मार्च : सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. पाकनं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमेवर गोळीबार केला. पाकिस्तानच्या या आगळीकीला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीर सातत्याने धुमसत आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या कुरापतींना भारतीय सैन्याने आक्रमक प्रत्युत्तर दिल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता अखनूर सेक्टरमधे पहाटे 3 च्या सुमाराला पाकिस्तानकडून गोळीबाराला सुरूवात झाली. भारतीय सैन्याच्या प्रत्त्युत्तरानंतर सकाळी 6.30 वाजता हा गोळीबार थांबला.

भारताच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करायला सुरुवात केली आहे. 26 फेब्रुवारी रोजी भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्यानं भारतीय चौक्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली.

दरम्यान, 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं दहशतवाद्यांसह पाकिस्तानला देखील इशारा दिला. भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक करत जवळपास 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. परिणामी पाकनं आम्ही देखील प्रत्युत्तर देऊ अशी भाषा केली.

चौघाना धडक देत त्यानं आणखी दामटला ट्रक; थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

First published: March 4, 2019, 8:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading