पुलवामामध्ये 16 तासापासून सुरू आहे चकमक, DIG सह 4 जण जखमी

पुलवामामध्ये 16 तासापासून सुरू आहे चकमक, DIG सह 4 जण जखमी

पुलवामातील पिंगलान येथे मागील 16 तासापासून दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

  • Share this:

पुलवामा, 18 फेब्रुवारी : 14 फेब्रुवारी पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यानंतर लष्करानं मोठ्या प्रमाणात शोध मोहिम सुरू केली आहे. सध्या पुलवामामधील पिंगलान येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मागील 16 तासापासून चकमक सुरुच आहे. यामध्ये 4 जवान शहीद झाले असून 1 डीआयजीसह 4 जवान जखमी झाले आहेत. तर, दोन दहशतवद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

पुलवामा येथे जैश - ए - मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी स्फोट केला. त्यामध्ये 42 जवान शहीद झाले. यानंतर भारतीय लष्काराला कारवाईसंदर्भातील पूर्ण अधिकार देण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

देशातदेखील सध्या दहशतवाद्यांविरोधात संतापाचं वातावरण असून त्यांचा खात्मा करा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, या पुलवामातील हल्ल्यानंतर लष्करानं दहशतवाद्यांची यादी केली असून सर्च ऑपरेशन जारी करण्यात आलं आहे.

टॉपचे 2 दहशतवादी ठार

लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार गाजी रशिद उर्फ कामरान आणि हिलाल अहमद या दोघांचा समावेश आहे. पुलवामा हल्ल्यासाठी गेल्या महिन्यात पुंछ मार्गे जैश-ए-मोहम्मदचे 15 दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केली होती. या दहशतवाद्यांमध्ये कामरानचा देखील समावेश होता. काश्मीरमधील स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याने काही उपकरणे आणि अन्य स्फोटके देखील आणली होती.

28 वर्षीय दहशतवादी राशिद दोन महिन्यांपूर्वी कुपवाडा मार्गे भारतात दाखल झाला होता. राशिद याने एका अफगाण युद्धात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. पाकिस्तान लष्कराच्या एका विशेष गटाने राशिदला प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तान लष्करामधील एका गटाकडून पाक व्याप्त काश्मीरमधील ऑपरेशनवर लक्ष ठेवले जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राशिदने पाकिस्तानमधील उत्तर-पश्चिम सीमा भागातील एका युद्धात सहभाग घेतला होता. अफगाणिस्तानमध्ये मुजाहिद्दीन असलेल्या गाजी राशिद हा आयईडी एक्सपर्ट होता. राशिद आणि त्याचा दोन साथीदारांनी डिसेंबरमध्ये भारतात घुसखोरी केली होती. त्यानंतर ते दक्षिण काश्मीरमध्ये लपले होते.

video viral: 'कश्मीर किसी के अब्बा की जागीर नही', ४ वर्षांच्या नवेलीचा पाकला दम

First published: February 18, 2019, 6:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading