दिवाळी आणि नवीन वर्षामध्ये तुम्ही फटाके उडवण्याच्या बेतात असाल तर जर थांबा. फक्त दिल्लीमध्ये नाही ज्या शहरांमध्ये प्रदूषण जास्त आहे तिथे फटाके उडवण्यावर बंदी येणार आहे.
दिवाळी, नाताळ आणि नववर्षानिमित्त फटाके उडवण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (NGT)च्या या आदेशामुळे मोठा झटका बसला आहे.
हवेच्या प्रदूषणावर लगाम घालण्यासाठी जास्त प्रदूषण असणाऱ्या शहारांमध्ये एनजीटीने 30 नोव्हेंबरपर्यंत फटाके बॅन केले आहेत.
ज्या शहरांची हवेची पातळी वाईट आहे त्या शहरात फटाके उडवण्यावर पूर्ण बॅन असणार आहे. ज्या शहरांची हवेची गुणवत्ता सामान्य आणि चांगली आहे त्या शहरांतील लोकांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार फटाके उडवण्यास परवानगी मिळेल.
ज्या शहरांची हवेची गुणवत्ता सामान्य आणि चांगली आहे त्या शहरांतील नागरिकांना ग्रीन फटाके उडवता येतील.
ज्या शहरांचा एयर क्वालिटी इंडेक्स 101 पेक्षा जास्त आहे त्या शहरांमध्ये फटाके उडवण्यावर बंदी घालण्यात येणार आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.