Home /News /national /

काही क्षणात सराफ-मोबाईल दुकानं जळून खाक, कॉम्प्लेक्समधील भीषण आगीचा पाहा VIDEO

काही क्षणात सराफ-मोबाईल दुकानं जळून खाक, कॉम्प्लेक्समधील भीषण आगीचा पाहा VIDEO

सेंट्रल मॉलच्या आगीची अहमदाबादमध्ये पुनरावृत्ती, सोन्या-चांदीची दुकानं जळून खाक

    अहमदाबाद, 06 डिसेंबर : कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात दुकानं आणि समान जळून खाक झालं आहे. सुदैवानं मोठी जीवितहानी टळली तर नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू केल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतील सेंट्रल मॉलला लागलेल्या इतकीची पुनरावृत्ती अहमदाबाद इथे झाल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणात दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी होती. आगीमुळे परिसरात उंच धुराचे लोट होते. या आगीची माहिती मिळताच तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. गुजरातच्या अहमदाबाद इथे बापूनगर परिसरात श्याम-शिखर टॉवरमधील कॉम्प्लेक्समध्ये भीषण अग्नितांडव झाला. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. रविवारी सकाळी 6 च्या सुमारास एक बंद चहाच्या दुकानात ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. या आगीनं काही क्षणात रौद्र रूप धारण करत जवळपास अर्ध्याहून अधिक कॉम्प्लेक्स आपल्या भक्ष्यस्थानी केलं आहे. या आगीची दाहकता दाखवणारे व्हिडीओ समोर आले आहेत. हे वाचा-पत्नीने पाहिली क्राइम पेट्रोल मालिका,पतीच्या हत्येचा कट ऐकून पोलीसही झाले हैराण या आगीत सोन्या-चांदीच्या दुकानांसह मोबाईलचं दुकानं देखील जळून खाक झालं आहे. मोठ्या प्रमाणात सामानाचं नुकसानं झालं आहे. अग्निशमन दलानं या आगीवर अर्ध्या तासात नियंत्रण मिळवल्यानं मोठा अपघात टळला. रविवार असल्यानं सगळी दुकानं बंद होती आणि विशेष गर्दी देखील नसल्यानं मोठा अपघात टळला आहे. या आगीचं अद्याप नेमकं कारण समोर येऊ शकलं नाही. पण चहाच्या दुकानात आग लागली होती आणि ती भडकल्यामुळे ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Gujrat

    पुढील बातम्या