‘फक्त माझं बाळ वाचवा’!  महापुरातून  नवजात बाळ आणि आईची थरारक सुटका; पाहा VIDEO

 ‘फक्त माझं बाळ वाचवा’!  महापुरातून  नवजात बाळ आणि आईची थरारक सुटका; पाहा VIDEO

मी गेली तरीही चालेल फक्त माझं बाळ वाचवा असा टाहोच त्या मातेने फोडला होता.

  • Share this:

भूवनेश्वर 28 ऑगस्ट: देशातल्या काही राज्यांमध्ये सध्या पावसाचं थैमान सुरु आहे. नद्या नाले तुडूंब भरून वाहत आहेत. नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांचा जगापासून संपर्क तुटला आहे. ओडिशातलं जयपूर गावही पुराच्या पाण्यात वेढलं गेलं. तिथे एका महिलेने बाळाला जन्म दिला होता. काही तासातच नदीचं पाणी गावात घुसल्याने गावचा संपर्क तुटला होता. शेवटी बचाव पथक आल्यानंतर त्यांनी एक दोरी बांधून त्या आई आणि बाळाची थरारक सुटका केली आणि त्या आई आणि मुलाचे प्राण वाचले.

व्हिडिओमध्ये दिसणारं पुराचं पाणी पाहिलं तरी अंगाचा थरकाप झाल्याशिवाय राहणार नाही. इथल्या रस्त्यांना नदीच्या प्रवाहासारखं स्वरुप आलं होतं. गावकऱ्यांच्या सुटकेसाठी बारी इथल्या फायर ब्रिगेडचे जवान आले होते.

त्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोर बांधून आई आणि मुलाची सुटका करण्याचा निर्णय घेतला. बाळाला एका बॉक्समध्ये सुरक्षीत ठेवण्यात आलं होतं. एका जवानाने त्याला स्वत:च्या कुशीत घेत माय-लेकांची सुखरुप सुटका केली. मी गेली तरीही चालेल फक्त माझं बाळ वाचवा असा टाहोच त्या मातेने फोडला होता.

या सगळ्या ऑपरेशन दरम्यान आईच्या जीवात जीव नव्हता. तिचं सर्व लक्षं बाळासाठी लागलं होतं. बाळ जेव्हा सुखरुप आलं तेव्हा तिच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. आई आणि बाळाला नंतर होडीतून सुरक्षीत ठिकाणी नेण्यात आलं. त्या दोघांसाठी तो जवान हा साक्षात देवदूतच ठरला होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 28, 2020, 6:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या