विमानवाहू युद्धनौका INS विक्रमादित्यला भीषण आग, अधिकाऱ्याचा मृत्यू

विमानवाहू युद्धनौका INS विक्रमादित्यला भीषण आग, अधिकाऱ्याचा मृत्यू

INS विक्रमादित्यला लागलेल्या आगीत अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

कारवार, 26 एप्रिल : विमानवाहू युद्धनौका INS विक्रमादित्यला आग लागली. या आगीत एका अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आगीचं कारण मात्र कळू शकलं नाही. कारवार येथील नौदल बेसवर जात असताना INS विक्रमादित्यला ही आग लागली. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं आहे. यामध्ये लेफ्टनंट कमांडर डी.एस. चौहान यांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर लेफ्टनंट कमांडर डी.एस. चौहान गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आगीनंतर नौदलानं त्वरीत चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे चौकशीअंती आगीचं नेमकं कारण स्पष्ट होईल.


VIDEO: राधाकृष्ण विखेंच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 03:49 PM IST

ताज्या बातम्या