Home /News /national /

दिल्लीतील शाहीन बाग भागात भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

दिल्लीतील शाहीन बाग भागात भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

शाहीन बाग भागातील एका दुकानाला रात्री पावणे नऊच्या सुमारास आग लागली होती. नंतर ती झपाट्याने परिसरात पसरली.

    नवी दिल्ली, 29 मार्च: NRC आणि CAAच्या विरोधातील आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या शाहीन बाग परिसरात रविवारी रात्री भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शाहीन बाग भागातील एका दुकानाला रात्री पावणे नऊच्या सुमारास आग लागली होती. नंतर ती झपाट्याने परिसरात पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर काही मिनिटांत नियंत्रण मिळवलं. स्‍थानिक नागरिकांनी सांगितलं की, एका फर्निचरच्या दुकानाला ही आग लागली होती. नेमकी आग कशामुळे लागली, हे समजू शकलं नाहा. शॉर्ट सक्रिटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हेही वाचा...Coronavirus : कलाकारांकडून मदतीचा ओघ तरी बिग बी शांत का? ट्रोलर्सना बच्चन यांचे 'असे' उत्तर तब्बल तीन महिने चालले आंदोलन.. शाहीन बाग परिसरात काही दिवसांपूर्वी एनआरसी आणि सीएएच्या विरोधातील आंदोलन सुरु होते. तब्बल तीन महिने हे आंदोलन चालले. नंतर दिल्ली पोलिसांनी हस्तक्षेप करुन आंदोलन स्‍थळ रिकामे करण्यात आले होते. पोलिसांनी थेट जेसीबीच्या मदतीने आंदोलकांचा टेंट काढून टाकला होता. शाहीन बाग येथे आंदोलन करणाऱ्या महिलांना कोरोना व्हायरसचा धोका असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर आंदोलन समाप्त करण्याची विनंती केली होती. मागील तीन महिन्यांपासून मुस्लिम महिला CAA आणि NRC विरोधात आंदोलन करत होत्या. या आंदोलनामुळे दिल्लीतील शाहीन बाग परिसर चर्चेत आला होता. हेही वाचा...800 कोटींचा मालक असलेल्या धोनीचं एक स्वप्न, क्रिकेटमधून 30 लाख कमवायचे आणि...
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या